शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएचसी’च्या कामात खोडा

By admin | Updated: January 22, 2015 02:17 IST

तालुक्यातील ब्राह्मणगाव परिसरातील दहा ते बारा गावातील रुग्णांसाठी परिसरात कोणतीही सुविधा नसल्यामुळे अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ब्राह्मणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे.

राजाभाऊ बेदरकर उमरखेडतालुक्यातील ब्राह्मणगाव परिसरातील दहा ते बारा गावातील रुग्णांसाठी परिसरात कोणतीही सुविधा नसल्यामुळे अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ब्राह्मणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. परंतु यासाठी लागणाऱ्या जागेचे प्रमाणपत्र देण्यासाठी वनविभागाकडून तब्बल तीन महिन्यांपासून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले आहे. ब्राह्मणगाव येथे मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेसंदर्भात विविध विभागाकडून सदर जागा आरक्षित आहे किंवा कसे याबाबत संबंधित विभागांनी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, यासाठी मागील तीन महिन्यांपासून ब्राह्मणगाव ग्रामपंचायतकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. परंतु उमरखेड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याने जागा मंजूरीबाबतचे काम रखडले गेले आहे. त्यामुळे ब्राह्मणगावसह परिसरातील दहा ते बारा गावातील शेकडो रुग्णांना आर्थिक व मानसिक भुर्दंड सहन करून तालुक्याच्या ठिकाणी उपचारार्थ जावे लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होवूनही केवळ वनविभागाच्या आतताई पणाच्या भूमिकेमुळे रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. दहा ते बारा गावांमधील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी शासनाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. यासाठी ब्राह्मणगाव ग्रामपंचायत हद्दीतील पाच हजार ७३९ क्षेत्रफळ चौरस मिटरची जागा राखीव करण्यात आली आहे. ही जागा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे त्रुटीच्या पूर्ततेसाठी सदर प्रकरण उमरखेड तहसील कार्यालयाकडे परत पाठविले. यात त्रुटीची पूर्तता होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड, सहायक विद्युत अभियंता उमरखेड, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड या सर्व विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात आले होते. इतर सर्व विभागांनी सार्वजनिक आरोग्य सुविधेच्या कामाला तत्परता दाखवून तत्काळ ना हरकत प्रमाणपत्र विनाविलंब देण्याचे आपले कर्तव्य पार पाडले. परंतु वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मात्र यामध्ये खोडा निर्माण केला आहे. सदर प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे सांगून त्यांनी सदर प्रकरण उपवनसंरक्षक अधिकारी पुसद यांच्याकडे असल्याची टोलवाटोलवी केली. त्यावरून उमरखेड तहसील कार्यालयाने उपवनसंरक्षक अधिकारी पुसद यांच्याकडे पत्रव्यवहार केला असता त्यांनी शासन निर्णयानुसार हे प्रकरण वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांच्या अखत्यारित येत असल्याचे स्पष्ट केले. सार्वजनिक कामासाठी व आरोग्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास तब्बल तीन महिन्यांपासून टाळाटाळ करून सार्वजनिक कामामध्ये खोडा निर्माण करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना असे करण्यामध्ये काय स्वारस्य आहे, हा प्रश्न ब्राह्मणगावचे सरपंच गुलाबराव पठाण यांनी केला आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांना समज देवून सार्वजनिक कामातील अडथळा दूर करावा अशी मागणी ब्राह्मणगाव येथील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते उपलब्ध होवू शकले नाही. (प्रतिनिधी)