शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसच्या नऊ नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: May 30, 2014 00:24 IST

दिग्रस नगरपरिषदेत झालेल्या सभेनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर नाट्यमय घटनेत मुख्याधिकार्‍यांनी नऊ नगरसेवकाविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

मुख्याधिकार्‍यांविरूध्दही तक्रार : महिला नगरसेविकांनी केला विनयभंगाचा आरोपदिग्रस : दिग्रस नगरपरिषदेत झालेल्या सभेनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर नाट्यमय घटनेत मुख्याधिकार्‍यांनी नऊ नगरसेवकाविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. तर महिला नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांवर विनयभंगाचा आरोप करीत पोलिसात तक्रार दिली.दिग्रस नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सकाळी ११ वाजता आयोजित होती. या सभेत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि शिवसेना नगरसेविकात खडाजंगी झाली. त्यानंतर काही वेळातच मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी शिवसेना नगरसेवक, नगरसेविका आणि नगरसेविकांचे पती तसेच ५0 कार्यकर्त्यांनी सभागृहात शिरुन शिवीगाळ केली. मुख्य लिपिक दयाराम पवार याचा गळा पकडून शासकीय कर्मचार्‍यावर हल्ला केला. कागदपत्रे फाडली, दस्ताऐवज चोरुन नेला अशी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सुभाषचंद्र अटल, जावेद पहेलवान, रामाकांत काळे, अशोक गावंडे, ज्योत्स्ना फिसके, मीना महिंद्रे, कल्पना देशमुख, बेबी अरगडे, रवींद्र अरगडे, दीपक फिसके, जयवंतराव देशमुख यांच्यासह ५0 जणांवर १४३, ३५३, ३७९, ५0४, २0७ कलमान्वये गुन्हे दाखल केले तर शुक्रवार ३0 मेपासून सर्व कर्मचारी  आंदोलन करणार असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले.तर शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांवर विनयभंगाचा आरोप केला. नगरसेविका मुख्याधिकार्‍यांच्या कक्षात गेल्या असता त्यांना ईल शिवीगाळ करून पाचही महिलांना धक्काबुक्की केल्याचे म्हटले आहे. तूर्तास पोलिसांनी मुख्याधिकार्‍यांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही. मात्र मुख्याधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास ३0 मे रोजी दिग्रसमध्ये मोर्चा काढून शहर बंद ठेवण्याचा इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिला आहे. यामुळेच एकच खळबळ उडाली आहे.  (प्रतिनिधी)