शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात पाणी टंचाईचे सावट

By admin | Updated: March 5, 2017 01:06 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील पाण्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे.

नागरिक हतबल : पाणी पुरविण्यास नगरपंचायत ठरली असमर्थ मारेगाव : उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील पाण्याच्या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. असे असले तरी शहरातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यास नगरपंचायत प्रशासन असमर्थ ठरत असून शहरात पाण्याचे स्त्रोत नसल्याने पाण्याची समस्या कशी सोडवावी, या प्रश्नाने नगरपंचायत प्रशासन हतबल झाले आहे. मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ३० वर्षांपूर्वी १० हजार लिटरची टाकी बांधण्यात आली होती. या टाकीत शहरालगतच्या पिसगाव नाल्यावरील विहिरीतून पाणी पुरवठा केला जात असे. परंतु तीन किलोमीटर अंतराची नळयोजनेची पाईपलाईन जीर्ण झाली. अनेक ठिकाणी पाईप फुटले. त्यामुळे दोन वर्षांपासून ही नळयोजना बंद पडली. तत्कालिन ग्रामपंचायतीने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहरातील अनेक वॉर्डात बोअरवेल मारून त्यावर मोटारपंप बसवून नागरिकांना पाणी पुरवठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु शहरात खोदलेल्या बोअरवेलला पुरेसे पाणी नसल्याने आणि वीज पुरवठा चांगल्या दाबाचा होत नसल्याने अनेकदा बोअरवेलमधील मोटारपंप जळून शहरातील पाणी पुरवठा ठप्प होतो. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतररत्र भटकावे लागत असल्याचे चित्र शहरात आतापासूनच पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. परिणामी भूजल पातळी झपाट्याने खोल चाचली आहे. पाण्याची पातळी खालावल्याने शहरातील वॉर्ड क्रमांक आठ, १५, चार, तीनसह अनेक वॉर्डात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. बोअरवेलला पाणीच नसल्याने भविष्यात शहरातील पाणी समस्या उग्ररूप धारण करणार आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडे स्वत:च्या मालकीचे कोणतेही साधन नाही. लोकांच्या मागणीचा रेटा पुढे केल्यानंतर नगरपंचायत प्रशासन किरायाने टँकर घेऊन पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करते. परंतु शहराला पाणी पुरवठा कमी आणि पाण्यासाठी नागरिकांची भांडणेच जास्त, असाच प्रकार उन्हाळाभर शहरात सुरू असतो. आता शहरातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता नगरपंचायत प्रशासनाने १० मार्च रोजी शुक्रवारी विशेष सभा आयोजित केली आहे. सभेत नगरसेवक पाण्याची समस्या आक्रमकपणे मांडणार असल्याने ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. (शहरप्रतिनिधी)