सराफा बाजार थंडावला : चैनीच्या वस्तूंकडेही ग्राहकांची पाठ, वाहनांच्या शो-रूममध्येही शुकशुकाटरूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीया म्हणजे खास खरेदीचा दिवस. सुवर्ण खरेदीसह इतर खरेदी याच दिवशी करण्याचा ग्राहकांचा खास कल असतो. कृषीवर आधारित असलेल्या यवतमाळच्या बाजारपेठेवर मात्र अक्षय्य तृतीयेला दुष्काळाचे सावट दिसत आहे. सराफांनी तयारी केली असली तरी बाजार मात्र थंड आहे. चैनीच्या वस्तू आणि प्लॉट, घर खरेदीही लांबणीवर टाकण्याच्याच मन:स्थितीत ग्राहक आहे.अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिनी सोन्याची खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. थोडे थोडके का होईना परंतु दरवर्षी अक्षय्य तृतीयेला बहुतांश नागरिक सोन्याची खरेदी करतात. त्यासाठी सराफा बाजार सजली असते. यंदाही अक्षय तृतीयेसाठी बाजारपेठ सजली आहे. परंतु कृषीवर आधारित असलेल्या बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट आहे. खरिपात अपुरा पाऊस, रबीत गारपीट आणि उन्हाळ्यात अवकाळी पाऊस अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडले आहे. शेतकऱ्यांच्याच हातात पैसा नाही तर खरेदी करणार तरी कशी. बाजारपेठेचे चक्रच जणू थांबल्याचे दिसत आहे. गत काही महिन्यांपासून संपूर्ण बाजारपेठेवर अवकळा आल्याचे दिसत आहे. खरेदीसाठी केवळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची तेवढी गर्दी असते. अशाच दुष्काळी परिस्थितीत अक्षय तृतीया आली आहे. अनेक जण अक्षय्य तृतीयेला वाहन खरेदीचा मुहूर्त पाळतात. मात्र यावर्षी खरेदी करणाऱ्यांची गर्दी शोरूममध्ये दिसत नाही. गतवर्षी झालेल्या खरेदीच्या तुलनेत नोंदणी कमी दिसत आहे. दरवर्षी ६० टक्केच्या आसपास ग्राहक दुचाकी खरेदी करतात. तर ४० टक्के कर्जावर वाहन खरेदी होते. यावर्षी मात्र विरुद्ध चित्र आहे. ८० टक्के कर्ज प्रकरणांच्या केसेस आहे. २० टक्के ग्राहक नगदीने वाहन खरेदी करीत आहे. एसी, कुलरची मागणी थांबलीअक्षय्य तृतीयेला कुलर अथवा एसी खरेदी करण्याचा अनेकांचा मानस होता. परंतु वातावरणातील बदलामुळे भर उन्हाळ्यात पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे ग्राहक कुलर आणि एसी खरेदी करताना दिसत नाही. मोबाईलची मागणी कायम बाजारपेठेतील चढउतार काहीही असला तरी मोबाईलच्या बाजारावर मात्र कुठलाही परिणाम जाणवत नाही. स्मार्ट फोन खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन सुविधांच्या कमी दरातील मोबाईलची मागणी अधिक आहे. कापड खरेदीत मंदीअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नाचे कापड हमखास खरेदी होतात. यावर्षी कापड खरेदी अद्यापही दृष्टीस पडली नाही. त्यामुळे कापड व्यावसायिका हातावर हात ठेऊन बसल्याचे चित्र आहे. गहुला कचुला आणि घागरी४अक्षय्य तृतीयेच्या बाजारात गहुला कचुला आणि घागरी मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या आहे. शहरातील चौकाचौकात लाल रंगाच्या घागरी विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच मोठ्या प्रमाणात आंबाही बाजारात आला आहे. किंमत घटली तरीही उठाव मात्र कमीजागतिक बाजारपेठेत दररोज सोन्याच्या किंमती घटत आहे. वर्षभरात सोन्याच्या किंमती किलो मागे दोन लाखांनी घटल्या आहेत. मात्र यानंतरही सोने खरेदीसाठी उठाव नाही. या प्रकाराने व्यापारीही अचंबित झाले आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या पर्वावर २४ कॅरेट सोन्याची नोंदणी केली जाते. मराठी माणूसही या दिवशी सोने खरेदीत आघाडीवर असतो. परंतु यावर्षी कोणतीच नोंदणी झाली नाही. त्यामुळे सुवर्णकार चिंतेत आहे.
अक्षय्य तृतीयेच्या बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट
By admin | Updated: April 21, 2015 01:40 IST