शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

बहुतांश गावांत दुहेरी लढती

By admin | Updated: July 12, 2015 02:36 IST

वणीसह पांढरकवडा, मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींसाठी तब्बल १ हजार ७५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

वणी : वणीसह पांढरकवडा, मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींसाठी तब्बल १ हजार ७५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चारही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. येत्या २५ जुलैला ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यासोबतच काही ठिकाणी रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. वणी तालुक्यात सर्वाधिक ४२ ग्रामपंचायतींच्या १२९ प्रभागातून ३१८ सदस्य निवडून देण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ७२५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय वणी तालुक्यात २१ गावांमध्ये २७ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी ४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. वणी तालुक्यात चार ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध होणार आहे. पांढरकवडा तालुक्यात १२ ग्रामपंचायतींच्या ३९ प्रभागातून १0४ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी २७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय आठ गावांमधील रिक्त असलेल्या आठ जागांसाठी केवळ आठच अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे या सर्व जागा आता अविरोध विजयी घोषित होणार आहे. मारेगाव तालुक्यात ११ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ३३ प्रभागामधून तालुक्यात ८१ सदस्य निवडून द्यावयाचे आहे. त्यासाठी २0३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय १७ गावांमध्ये २३ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी केवळ आठच अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे १५ जागा पुन्हा रिक्तच राहणार आहे.झरीजामणी तालुक्यात २६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर चार ग्रामपंचायतींच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीत ८२ प्रभागातून २१२ सदस्य, तर पोटनिवडणुकीतून सहा सदस्य, असे एकूण २१८ सदस्य निवडून द्यावयाचे आहे. त्यासाठी तब्बल ४९४ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. वणी, पांढरकवडा, मारेगाव व झरी या तालुक्यात जागांच्या प्रमाणात किमान दोन ते अडीच पट अर्ज दाखल झाल्याने बहुतांश ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. काही गावांमध्ये मात्र तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)