शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यावर सुखाचा पाऊस

By admin | Updated: September 1, 2016 02:29 IST

सुरुवातीला शेतकऱ्यांची दाणादाण करून महिनाभरापासून वरुणराजा रुसून बसला. खरिपाची पिके तहानली.

वरुणराजा पावला : घुंगरमाळा वाजे खळखळा, आज आहे बैलपोळारूपेश उत्तरवार  यवतमाळसुरुवातीला शेतकऱ्यांची दाणादाण करून महिनाभरापासून वरुणराजा रुसून बसला. खरिपाची पिके तहानली. पीक करपण्यास सुरुवात झाली. अशातच शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा पोळा सण तोंडावर आला. शेतातील पीक पाहून शेतकऱ्याचे पोळ्याच्या खरेदीत मनच लागत नव्हते. अखेर महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर पोळ्याच्या सणावर सुखाचा पाऊस बरसला आणि बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला बाजारात शेतकऱ्यांची खरेदीसाठी गर्दी झाली. सतत तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पहिल्यांदाच सुरुवातीला समाधानकारक पाऊस बरसला. काही ठिकाणी अतिपावसाने जमीन चिबडली. परंतु याही परिस्थितीत शेतकरी सुखावला होता. यंदा अमाप पीक होईल, अशी आशा होती. मात्र आॅगस्ट पहिल्या आठवड्यापासून पावसाने पाठ फिरविली. आज ना उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी होते. तीन आठवडे झाले तरी पावसाचा पत्ता नव्हता. ओलित करण्यात वीज वितरणचा अडथळा येत होता. अशातच पोळा सण तोंडावर आला. मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नव्हते. शेतात फेरफटका मारला की त्याला करपणारे पीक दिसत होते. अशा बिकट स्थितीत पोळ्याचा साज खरेदी करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला होता. मात्र गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात अचानक ढगाळी वातावरण झाले. मंगळवारी दुपारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. सोयाबीनला जीवदान मिळाले. बुधवारीही ढगाळ वातावरण निर्माण होवून काही ठिकाणी पाऊस बरसला. परिणामी शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पोळ्याच्या सणाला समाधानाची झुल शेतकऱ्यावर चढविली गेली. पोळा दोन दिवस होणार साजरामहाराष्ट्रीय सण-उत्सव साजरा करताना मराठी तिथीचा अवलंब केला जातो. संपूर्ण सण अमावस्या आणि पौर्णिमा या दोन प्रमुख बाबींवर अवलंबून असतात. सूर्याने पाहिलेले पहिली तिथी ग्राह्य धरली जाते. यातूनच सण-उत्सव साजरे होतात. ३१ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजतापासून अमावसेला प्रारंभ झाला. गुरुवारी दुपारपर्यंत अमावस्या आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पोळा कोणत्या दिवशी साजरा करावा, अशा द्विधा मनस्थितीत सापडले होते. काही ठिकाणी बुधवारी पोळा साजरा करण्यात आला, तर काही ठिकाणी गुरुवारी पोळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यात दोन दिवस पोळ्याची धूम दिसणार आहे. झडत्यांची व्हॉट्सअ‍ॅप धूमपोळा म्हणजे कष्टकऱ्यांच्या सन्मानाचा सण. या सणाला श्रमाचे प्रतिक असलेल्या बैलाची पूजा केली जाते. अलिकडे सोशल मीडियाही सण-उत्सवात आघाडीवर दिसत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर मंगळवारपासूनच झडत्यांची धूम दिसत आहे. ग्रामीण टच असलेल्या नेटीजन्सने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून झडत्या वायरल केल्या आहे. कधीकाळी केवळ पोळ्याच्या तोरणासमोर म्हणणाऱ्या झडत्या आता सोशल मीडियातून फिरू लागल्या आहे. अखेरच्या दिवशी बाजारात गर्दीसतत दुष्काळाचा सामना करणारा शेतकरी यंदाही महिनाभरापासून दुष्काळाच्याच सावटात होता. महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी अस्वस्थ झाला होता. मात्र पोळ्याच्या दोन दिवस आधीपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी बाजारपेठ गाठली. अखेरच्या दिवशी खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी बाजारपेठेमध्ये दिसत होती.