शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

दुष्काळाने मरण झाले स्वस्त

By admin | Updated: December 21, 2014 23:07 IST

यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. ‘जाऊ तेथे खाऊ’, या मराठी चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या

पीक हातचे गेले : पाणी नाही, पीक नाही अन् पैशाचेही वांदे, बळीराजाची शोकांतिकागणेश रांगणकर - नांदेपेरायावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. ‘जाऊ तेथे खाऊ’, या मराठी चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांचे मार्मिक वर्णन केले आहे़ ते यावर्षी शेतकऱ्यांना तंतोतंत लागू पडत आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे हताश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत मरणाला कवटाळत आहेत़ त्यांचे सारे काही उधार, उसणवारीवर चालते. पेरणीसाठी लागणारा पैसा कुठून आणला, असा प्रश्न शेतकऱ्यांना विचारला असता अनेक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतल्याचे सांगितले़ काही शेतकऱ्यांनी बचत गट, सोसायटीकडून कर्ज घेतल्याचे सांगितले़ पेरणीच्या चाड्यावर मूठ ठेवण्यापासून ते पीक घरात येईपर्यंत, शेतकऱ्यांना जागोजागी पैसाच मोजावा लागतो़ त्यामुळे शेवटपर्यंत त्यांचा खर्च व उत्पन्न यांचा हिशेबच जुळत नाही़पीक हाती येताच उधार, उसणवारी फेडण्यात शेतकऱ्यांची दमछाक होते. यावर्षी तर पिकानेही चांगलाच दगा दिला. कपाशी, सोयाबिनची उतारी अत्यंत कमी आली. त्यातच बाजारात शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. त्यातूनच शेतकरी गळ्याभोवती फास अथवा विष प्राशन करीत असल्याने त्यांचे कुटूंब उघड्यावर पडत आहे़ घराचा आधारच गेल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण होतो़ भारत हा कृषी प्रधान देश म्हणविणाऱ्या शेतकऱ्यांच्या मरणानंतर त्यांच्या कुटुंबाकडे कुणी फिरकूनही बघत नाही़ एवढेच नव्हे तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मृत्यू पश्चात सरकारी मदतीसाठी पात्र, अपात्रतेच्या कसोटीला सामोरे जावे लागते. अथक परिश्रम घेऊन शेतकरी काळ्या आईची ओटी भरतो. परंतु पदी निराशाच पडते. यावर्षी खरीप, रबी हंगाम वाया गेल्याने पुढचा-मागचा हिशेब जुळायलाच तयार नाही़ शेतकऱ्यांचा डोक्यावरील खर्चाचा भार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे़ त्यामुळे शेकरी पुन्हा कर्जबाजारी होत आहे़दुष्काळाची लागलेली ‘दृष्ट’ पुसून शेतकरी जोमाने उभा राहण्यासाठी धडपडतो आहे. मात्र अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटही त्यांच्यासमोर आ वासून उभे आहे़ काही मोजके शेतकरी शेती व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. त्यांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्याने या व्यवसायातही आता घट होत आहे. त्यामुळे हा पूरक व्यवसायही मोडीत काढण्याची वेळ बळीराजावर ओढवली आहे़