शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी खुनाचा तपास एसडीपीओंकडे

By admin | Updated: December 20, 2015 02:33 IST

दुर्गा विसर्जनानंतर येथील मच्छीपूलस्थित रविदासनगर भागात झालेल्या दुहेरी खुनाचा तपास यवतमाळचे

आरोपींचा शोध : रविदासनगरातील घटनायवतमाळ : दुर्गा विसर्जनानंतर येथील मच्छीपूलस्थित रविदासनगर भागात झालेल्या दुहेरी खुनाचा तपास यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.दुर्गोत्सवानंतर मच्छीपूल येथे २५ आॅक्टोबर शनिवार रोजी रात्री ९.३० वाजता शेख इरफान शेख रमजान उर्फ बबलू आणि दुसऱ्या गटातील मो. इकबाल मो. जब्बार व मो. जावेद उर्फ कालू मो. जब्बार या तिघांचा दोन गटांच्या भांडणात खून करण्यात आला होता. तीनही खुनाचे हे प्रकरण आतापर्यंत यवतमाळ शहर पोलीस ठाण्याकडे होते. परंतु यातील मो. इकबाल व मो. जावेद या दुहेरी खुनाचा तपास शहर पोलिसांकडून काढून घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बबलूच्या खुनाचा तपास शहर पोलीसच करीत आहे. दुहेरी खूनप्रकरणात आठ आरोपी आहेत. यातील शेख रिजवान व शेख इमरान यांना अटक झाली. इतरांचा शोध सुरू आहे. याच दुहेरी खुनात राय परिवारातील तीन सदस्यांची नावेही आरोपी म्हणून समाविष्ट आहेत. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तपास येताच आरोपींच्या शोध मोहिमेचा वेग वाढला आहे. पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधार्थ नुकतेच नागपूरलाही जावून आले. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटकपूर्व जामीन मिळाला नसल्याचे व प्रकरणात उपलब्ध पुरावे पाहता जामिनाची शक्यता नसल्याचे एसडीपीओ कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. मच्छीपूल परिसरातील रविदासनगरातील तीन जणांच्या या खुनाच्या दोन घटनांमध्ये २२ आरोपी आहेत. या हल्ल्यात दोन जण जखमीही झाले होते. आता या प्रकरणाच्या तपासाला गती येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)