शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी हत्याकांडातील सुपारीचा मास्टर मार्इंड टप्प्यात

By admin | Updated: October 29, 2014 22:56 IST

दुहेरी हत्याकांडाची पाच मारेकऱ्यांना सुपारी देणारा मास्टर मार्इंड नांदेड पोलिसांच्या टप्प्यात असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

पोलीस तपासाला वेग : माहूर येथील युगुलाचे खूनप्रकरण यवतमाळ : दुहेरी हत्याकांडाची पाच मारेकऱ्यांना सुपारी देणारा मास्टर मार्इंड नांदेड पोलिसांच्या टप्प्यात असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. दरम्यान निरपराध व्यक्ती घटनेत गोवला जाऊ नये म्हणून पोलीस बारकाईने तपास करीत असल्याचेही सांगण्यात आले. अभियांत्रिकीची विद्यार्थिनी निलोफर खालीद बेग रा.पुसद आणि शाहरुख फिरोज खान पठाण रा. उमरखेड यांचे छिन्नविच्छन अवस्थेतील मृतदेह माहूर येथील रामगड किल्ल्यावर १० आॅक्टोबर रोजी आढळून आले होते. मात्र मारेकऱ्यांनी घटनास्थळी कुठलेही पुरावे सोडले नसल्याने या दोघांचा खून नेमका कोणी केला, याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. कॉल डिटेल्स् आणि मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पोलिसांनी मारेकरी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातही अपयशच हाती आले. त्यामुळे नांदेड पोलिसांनी गोपनीय माहितीवर लक्ष केंद्रीत केले. त्यामध्ये राजू उर्फ राजा रघुनाथ गाडेकर (२०) याचे नाव पुढे आले. खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये निलोफरचा मोबाईल हाती लागल्याने राजू उर्फ राजा हा हत्याकांडात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. कोठडी दरम्यान त्याने घटनेची कबुली देऊन साथीदारांची नावे उघड केली. तसेच या हत्याकांडासाठी शेख जावेद शेख हुसेन उर्फ पेंटर रा. माहूर याने सुपारी घेतली होती. ती त्याने आपल्याकडे सोपवून तोही घटनेत सहभागी झाल्याचे पोलिसांपुढे उघड केले. त्यावरून शेख जावेद शेख हुसेन उर्फ पेंटर, रंगराव शामराव बाबटकर, शेषराव उर्फ पिंटू शामराव बाबटकर, कृष्णा उर्फ बाबू मारोतराव शिंदे सर्व रा. माहूर यांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत हे दुहेरी हत्याकांड सुपारीतून झाल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तबच झाले. मात्र सुपारीचा मास्टर मार्इंड कोण याचा उलगडा झाला नव्हता. पाचही मारेकऱ्याच्या सांगण्यावरून सुपारी देणारा मास्टर मार्इंडची ओळख पटविण्यात आली आहे. केवळ निरपराध व्यक्ती घटनेत गोवला जाऊ नये म्हणून पोलीस बारकाईने तपास करीत आहे. कोणत्याही क्षणी त्याला अटक केली जाऊ शकते, अशी माहिती नांदेड पोलिसातील पिराजी गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या आरोपींना नेमकी किती रुपयांची सुपारी दिली होती. याचाही शोध पोलीस घेत आहे. तसेच या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याजवळून खुनासाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले असून शाहरुखचा मोबाईल फोन, मनी पॉकेट, विदेशी चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. समाजमन सुन्न करणाऱ्या या युगुलाच्या खून प्रकरणाचा छडा लागला. आरोपींनाही अटक झाली. मात्र या सुपारीचा सूत्रधाराला अद्यापही अटक झाली नाही. मात्र लवकरच तोही पोलिसांच्या जाळ्यात अडकेल, अशी माहिती नांदेड पोलिसांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)