शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडाचे आगार प्रभारावरच

By admin | Updated: June 11, 2017 00:26 IST

येथील एस.टी.आगारातील आगार प्रमुखाचा पदभार गेल्या अनेक दिवसांपासून प्रभारावर असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रवाशांना मनस्ताप : रात्रीच्यावेळी आगारात चालतो जुगार लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : येथील एस.टी.आगारातील आगार प्रमुखाचा पदभार गेल्या अनेक दिवसांपासून प्रभारावर असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी या आगारात जुगारही भरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येथील आगारात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. भंगार बसेसमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच आता येथील आगार प्रमुखाचा प्रभार यवतमाळ येथील आगार प्रमुखांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ते आठवड्यातून दोन-तीनदाच या आगारात येत असतात. त्यामुळे त्यांचा कोणत्याही कर्मचाऱ्यांवर वचक नसून मानमानी पद्धतीने वेळापत्रकानुसार वाहन न सोडणे आदी प्रकार या आगारात सुरू आहे. आगाराच्या प्रवेशद्वारासमोरच पाण्याचे मोठे डबके साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना आगारात जाताना नाहक त्रास सहन करावा लागतो. या चिखलात आता शहरातील मोकाट कुत्रे व जनावरेही लोळताना आढळून येते. विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी या आगारात काही युवक जुगार खेळत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे या परिसरात एखादा अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. आता शाळा, महाविद्यालयांना सुरूवात होणार असून अनेक विद्यार्थिनी बसचा पास काढून अपडाऊन करीत असतात. मात्र या परिसरात मजनुंचाही वावर अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थिनीमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्यावर्षी बसस्थानक परिसरात अनेक मजनुंना नागरिकांनी चोपसुद्धा दिला होता. त्यामुळे विद्यार्थिनींना बसस्थानकातच असुरक्षित वाटू लागले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन येथे कायमस्वरूपी आगार प्रमुखाची नियुक्ती करावी व आगाराचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.