शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँग्रेस कमिटीला अखेर ‘प्रभारी अध्यक्ष’

By admin | Updated: May 4, 2017 00:17 IST

जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा वाद गटबाजीमुळे मिटत नसल्याने अखेर प्रभारी अध्यक्ष देऊन या वादातून तोडगा काढला गेला.

वजाहत मिर्झा : गटबाजीवर असाही तोडगा यवतमाळ : जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा वाद गटबाजीमुळे मिटत नसल्याने अखेर प्रभारी अध्यक्ष देऊन या वादातून तोडगा काढला गेला. पुसदचे डॉ.वजाहत मिर्झा यांची जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ.मिर्झा प्रदेश चिटणीसही आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद माजी आमदार वामनराव कासावार यांच्याकडे होते. परंतु त्यांच्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाची वाताहत झाली, म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर नवा अध्यक्ष कोण? याचा निर्णय गेल्या दीड-दोन वर्षांत होऊ शकला नाही. अध्यक्षपदासाठी माजी मंत्री प्रा.वसंत पुरके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांची नावे आघाडीवर होती. याशिवाय इतर काहींचेही छुपे प्रयत्न सुरू होते. परंतु एक नाव विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या गटाकडून तर दुसरे नाव माजी मंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांच्या गटाकडून रेटले गेल्याने प्रदेश काँग्रेसला या गटबाजीत ठोस निर्णय घेता आला नाही. या वादात जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या निवडणुका काँग्रेस पक्ष अध्यक्षांशिवाय लढला. त्यात काँग्रेसचे पानीपत झाले. पक्ष संपायला येवूनही गटबाजी संपत नसल्याने प्रदेश काँग्रेसनेही जिल्ह्यातील या गटबाजीच्या राजकारणापुढे हात टेकले आहे. अजूनही अध्यक्षपदाचा निर्णय होत नसल्याचे पाहून बुधवारी अखेर प्रदेश काँग्रेसने यवतमाळ जिल्ह्याला तूर्त प्रभारी अध्यक्ष दिला आहे. पुसद येथील डॉ.वजाहत मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही गटांशी जुळवून घेतल्यास आणि पक्षसंघटन बांधणीत परफॉर्मन्स दिसल्यास डॉ.मिर्झा यांनाच पूर्णवेळ जिल्हाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)