शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे २४ हजार शेतकरी कर्जाला मुकणार

By admin | Updated: August 29, 2016 00:53 IST

खरीप कर्ज वितरणाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसावर आली असताना २४ हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही जिल्हा बँकेतून कर्ज मिळाले नाही.

३१ आॅगस्ट अंतिम मुदत : कर्ज पुनर्गठनासाठी हवे ६३ कोटीयवतमाळ : खरीप कर्ज वितरणाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसावर आली असताना २४ हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही जिल्हा बँकेतून कर्ज मिळाले नाही. या दोन दिवसात शासनाकडून निधी येण्याची सूतराम शक्यता नसल्याने या शेतकऱ्यांना हक्काच्या कर्जाला मुकावे लागेल. जिल्हा बँकेची ही स्थिती असताना राष्ट्रीयकृत बँकांबाबत तर कुणी बोलायलाही तयार नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे म्हणून सुरुवातीपासूनच प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. कर्ज वितरण मेळाव्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी दर १५ दिवसाला आढावा घेतला असे असतानाही १७०० कोटी रुपयांच्या उद्दीष्टांपैकी आतापर्यंत केवळ ६२ टक्के कर्ज वितरण करण्यात आले. एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांना एक हजार ६५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. मात्र १५ आॅगस्टपासून बँकांनी कर्ज वितरण थांबविले आहे. त्यात जिल्हा बँकेचाही समावेश आहे. शेतकऱ्याची बँक असलेल्या जिल्हा बँकेत कर्जपुनर्गठनासाठी २४ हजार शेतकरी पात्र ठरले. या सभासदांच्या कर्जपुनर्गनासाठी ६३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला. मात्र २८ आॅगस्टपर्यंत पैसेच पोहोचले नाही. वरिष्ठ पातळीवरही याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही. अशातच कर्ज वितरणाची अंतिम मुदत ही ३१ आॅगस्ट आहे. अवघ्या दोन दिवसावर अंतिम मुदत आली असताना शेतकऱ्यांना आता कर्जाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ६३ कोटी रुपये वितरित करताना १५ टक्के वाटा राज्य शासन भरणार आहे. राज्य शासनाचा वाटा आल्यानंतर नाबार्ड ६० टक्के आणि राज्य बँक १० टक्के वाटा देते. जिल्हा बँक १० टक्के स्वनिधी देतो. परंतु राज्य शासनाने आपला वाटा अंतिम मुदत जवळ आली तरी अद्यापही जमा केला नाही. त्यामुळे इतर निधीही जिल्हा बँकेकडे वळता झाला नाही. उर्वरित दोन दिवसात ही प्रक्रिया करणे अवघड आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून पोळ्याच्या तोंडावर तरी कर्ज मिळेल, अशी अपेक्षाही फोल ठरत आहे. आता काय होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले.(शहर वार्ताहर)