शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:05 IST

विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल शासनाने मंजुर केले.

ठळक मुद्देअधिकारीच नाही : कंत्राटी कर्मचारी व क्रीडा शिक्षकच सांभाळतात कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल शासनाने मंजुर केले. काही नवीन तालुक्याचे ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मितीही झाली. मात्र वणी तालुक्याला अजूनही सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल साकारले नाही. येथील क्रीडा मैदानावर मोडकळीस आलेल्या व सांगाडे उभ्या असलेल्या इमारती तसेच मैदानावर चिखल मातीचे साम्राज्य, अशी क्रीडा संकुलाची अवस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह क्रीडा विभागाचेही दुर्लक्ष होत आहे.वणी तालुका हा क्रीडा क्षेत्रात पुढारलेला तालुका आहे. येथे खेळाडूंची खाण आहेत. मात्र खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदानाचा अभाव व त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाचा अभाव असल्याने वणीचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात माघारत आहे.तालुक्याला तालुका क्रीडा संकुल मंजुर होऊन तप लोटले. परंतु क्रीडा संकुलाची निर्मिती अजूनही अपूर्णावस्थेत आहे. क्रीडा विभागाचे एक गोडाऊनसारखे जीर्णावस्थेतील कार्यालय तेवढे संकुल असल्याची जाणिव करून देत आहे. पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या शासकीय मैदानाला सभोवताल संरक्षण भिंत बांधून केवळ बंदीस्त करण्यात आले आहे.आता मात्र सारेच भकास दिसत आहे. एकाही क्रीडा प्रकारचे येथे कायम मैदान नाही. मैदानावर मातीचा पसारा दिसतो. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य दिसते. तरीही दररोज सकाळी या मैदानावर शेकडो विद्यार्थी आपल्या क्रीडांचा सराव करताना दिसून येतात. येथे एकाही क्रीडेचे बंदीस्त क्रीडागृह नाही. टेबल टेनीस, लॉन टेनीस, बॅडमींटन, कॅरम या क्रीडासाठी हॉल बांधकाम सुरू होऊन दहा तरी वर्षे लोटली. परंतु या इमारतीचे केवळ सांगाडे दिसून येत आहे. निधीअभावी या क्रीडा इमारतीचे बांधकाम रखडल्याचे सांगण्यात येते.क्रीडा मैदानाच्या सभोवार प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी तयार नाही. मैदानच नसल्याने क्रीडा साहित्य निरूपयोगी ठरत आहे. तालुक्यात ५० माध्यमिक शाळा आहेत. या शाळांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र सरावाचा व मार्गदर्शनाचा अभाव असल्याने खेळाडूंना पुढे वाव मिळत नाही.