शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची सर्व बाजूने अवहेलना

By admin | Updated: October 19, 2015 00:22 IST

शेती व्यवसाय हा निसर्गाच्या लहरीपणामुळे, शासनाच्या उदासीनतेमुळे व वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे सट्टेबाजीचा व्यवसाय बनला आहे.

उत्पन्नात घट : शासन म्हणते आत्महत्या टाळा, मात्र भाव देण्याची तयारी नाहींवणी : शेती व्यवसाय हा निसर्गाच्या लहरीपणामुळे, शासनाच्या उदासीनतेमुळे व वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे सट्टेबाजीचा व्यवसाय बनला आहे. मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांची चहुबाजूंनी अवहेलनाच होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढच होत असल्याचे शासन ऐकत आहे. तरी त्यावर काहीही ठोस उपाययोजना करण्याचे सोडून केवळ सांत्वना म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या टाळा एवढाच सबुरीचा सल्ला दिला जात आहे. उत्पन्नात दरवर्षी घटच होत आहे. मालाचे भाव वाढविण्याची शासनाची मानसीकता नाही मग शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांना पडला आहे.वणी तालुका कोळसा प्रवण असल्याने पिकांना पोषक ठरणारे वातावरण हळूहळू दुषीत होत आहे. कोळशाच्या धुळीमुळे जमिनीचा पोत कमी होत आहे. त्यामुळे तालुक्यातील कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांच्या उत्पन्नात सतत घट होत आहे. यावर्षी सोयाबीनचा उतारा तर शेतकऱ्यांना रडवून सोडणारा आहे. एक क्विंटल बियाणे पेरून त्या जागी एक ते दीड क्विंटल सोयाबीन निघत आहे. काढणीची मजुरी, थ्रेशरचा खर्च वजा केला तर शेतकऱ्यांच्या हातात त्याने शेतात गाळलेल्या घामाची दमडीही शिल्लक राहत नाही. तालुक्यात सिंचनाची व्यवस्था अत्यल्प आहे. यावर्षी पाऊसही अपूरा पडला. तरीही कापसाची झाडे जोमाने वाढून आली. यावर्षी कापूस शेतकऱ्यांना वाचवणार अशी स्थिती वाटत होती. मात्र मध्येच सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस आला. कापसाची झाडे लोटून पडली. अशा विषम वातावरणामुळे कापसालाही अपेक्षीत फळधारणा झाली नाही. पहिली बोंडे एकाच वेळी फुटली. त्यामुळे कापूस वेचायला मजूर मिळेनासे झाले. मजुरांची आयात सुरू झाली. एका क्विंटलला ५००-६०० रूपये वेचण्याची मजुरी द्यावी लागत आहे. एवढे चित्र डोळ्यासमोर दिसत असतानाही कापसाला भाव वाढविण्यासाठी शासनाचे पाऊल पडले नाही. एक क्विंटल कापूस विकला तर दीड किलो बियाणाची खरेदी होत नाही. खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या कापसाला चार हजाराचे आत भाव देत आहे. त्यामुळे शेतकरी आणखीच चिंतेत पडला आहे. जुने कर्ज फिटत नसल्याने बँका नवीन कर्जासाठी शेतकऱ्यांना दारात उभे ठेवत नाही. मग शेतीच्या भरवशावर संसार कसा चालवावा, असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यास शासन धजावत नाही. त्यासाठी पीक परिस्थिती समाधानकारक नसतानाही आणेवारी मात्र ५० पेक्षा अधिक काढण्याची किमया शासनाचा महसूल विभाग करीत आहे. परिणामी सरकारी मदतीवरही अंकुश लागला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)