शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

निर्गुडेचे झाले वाळवंट, पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:58 IST

यंदा अल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील जलसाठे कोरडे झाले आहे. वणीची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे पात्र ठिकठिकाणी आटले आहे.

ठळक मुद्देवणीकरांचे हाल : नवरगाव धरणात केवळ ५५.३० टक्के जलसाठा, शहरावर टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा अल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील जलसाठे कोरडे झाले आहे. वणीची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे पात्र ठिकठिकाणी आटले आहे. त्यामुळे पात्रात वाळवंटसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीच नसल्याने शुक्रवारी वणी शहरातील पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल झाले.नवरगाव धरणातून पाणी सोडण्यात आले असले तरी ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वणीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणी टाकीत घेऊन शुद्धीकरणानंतर ते वितरीत केले जाईल. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वणी शहरात निर्माण झालेली ही परिस्थिती भविष्यातील पाणी टंचाईची नांदी समजली जात आहे. दरम्यान संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन वणी नगरपालिकेच्यावतीने भुरकी (रांगणा) येथील वर्धा नदीच्या डोहातून वणी शहराला पाणी पुरवठा करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावर्षी वणी तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे आतापासूनच अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट घोंगावू लागले आहे. त्यातून वणी शहरदेखिल सुटले नाही. वणीतून वाहणाºया निर्गुडा नदीमध्ये नवरगाव धरणातून आवश्यक तेवढे पाणी सोडले जाते. मात्र या धरणातही केवळ ५५.३० टक्के जलसाठा आहे. तो ६.९० दलघमी एवढा आहे. परिणामी हे पाणी केवळ मार्च महिन्यापर्यंत पुरण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पाण्यासाठी हाहाकार उडणार आहे.सन २००० पासून अशीच परिस्थिती आहे. वणी तालुक्यातील कुंभारखणी कोळसा खाण सुरू झाल्यामुळे नदीतील कृत्रिम झरे खाणीकडे वळले. त्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदी पूर्णत: आटते. त्यानंतर मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून वणी शहरासाठी या नदीद्वारे पाणी घेतले जाते. मात्र यंदा नवरगाव धरणातच अल्प जलसाठा असल्याने भविष्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.पाचपैकी ४.४१ दलघमी पाण्याचा वापरयावर्षी वणी नगरपालिकेने नवरगाव धरणातून पाच दलघमी पाणी आरक्षित केले होते. त्यापैकी ३१ आॅक्टोबरपर्यंत ४.४१ दलघमी पाण्याचा वापर करण्यात आला. उर्वरित आरक्षित जलातून २ नोव्हेंबरला ०.२० पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले आहे. वणी शहराच्या पाणी वितरणासाठी दर महिन्याला एक दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पाणी सोडल्यानंतर नदी काठावरील शेतकरी याच नदीतील पाणी सिंचनासाठी मोटारपंपाद्वारे ओढतात. तसेच वाढत्या तापमानामुळे पाण्याचेही बाष्पीभवन होते. परिणामी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही.