रवींद्र राठोडच्या यशाने उमरखेडचा महाराष्ट्रात सन्मानअविनाश खंदारे उमरखेडमोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांपुढे मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न असतो. पण तालुक्यातील एका अशाच गरीब दाम्पत्याने आपल्या मुलाला थेट उपजिल्हाधिकारी करून दाखविले आहे. मंगळवारी लागलेल्या एमपीएससीच्या निकालाने या गरीब आईवडिलांच्या पदरात आनंदाचे भरभरून दान टाकले.जनुना येथील रवींद्र राठोड हा तरुण वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी उपजिल्हाधिकारी झाला आहे. त्याच्या या यशाने डोंगरदऱ्यातील जनुना गावाला अख्ख्या महाराष्ट्रात ओळख मिळाली आहे. जनुना गावात आदिवासी व बंजारा समाजाची वस्ती अधिक आहे. तरीही गेल्या काही दिवसांपासून हे गाव शैक्षणिक प्रगतीत चर्चेत आहे. रवींद्रचे वडील शंकर राठोड हे केवळ दहावीपर्यंत शिकलेले. आई संगीताचेही शिक्षक केवळ चौथीपर्यंतच. हलाखीमुळे ते खूप शिकू शकले नाही. पण आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे, अधिकारी बनावे, ही त्यांची इच्छा होती. या गरीब आईबाबाच्या पोटी जन्मलेला रवींद्रही लहानपणापासूनच तल्लख होता. त्याला शिकविण्यासाठी शंकर आणि संगीता दोघेही मोलमजुरी करून लागले. प्राथमिक शिक्षण रवींद्रने मामाच्या घरी राहून पूर्ण केले. मामा संतोष जाधव यांच्या चिल्ली गावातील शाळेतच रवींद्रच्या बुद्धीची धार दिसली होती. पाचवी ते सातवीपर्यंत तो जनुनाच्या शाळेत शिकला. आपल्या मुलगा हुशार आहे, त्याला शहरात शिकवले पाहिजे, हे जाणवल्याने आईवडिलांनी रवींद्रला उमरखेडच्या साकळे विद्यालयात टाकले. तेथे शिकताना १०व्या वर्गात रवींद्रने ८५ टक्के गुण मिळविले. त्यानंतर अधिक चांगले शिक्षण मिळविण्याच्या दृष्टीने नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ११वीला प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. वडील वसंत कारखान्यात रोजंदारीवर काम करत होते. नागपूरसारख्या शहरात खर्चही पेलवण्यापलीकडे होता. म्हणून ११वीनंतर रवींद्रला पुन्हा उमरखेड येथे बारावीसाठी यावे लागले.
मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांचा पुत्र झाला उपजिल्हाधिकारी
By admin | Updated: April 7, 2016 02:25 IST