शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपायाचा मुंबईत डेंग्यूने मृत्यू

By admin | Updated: September 17, 2016 02:40 IST

गणेशोत्सव बंदोबस्तासाठी मुंबई येथे गेलेल्या तालुक्यातील करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्याचा वासी (नवी मुंबई)

गणपती बंदोबस्त : करंजी महामार्ग पथकपांढरकवडा : गणेशोत्सव बंदोबस्तासाठी मुंबई येथे गेलेल्या तालुक्यातील करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्याचा वासी (नवी मुंबई) येथील फोर्टीस रूग्णालयात शुक्रवारी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. डेंग्यू सदृश्य आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अनुपसिंह बघेल (३१) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेत यवतमाळ येथे कार्यरत असलेल्या अनुपसिंह बघेलची महिनाभरापूर्वीच १८ आॅगस्ट रोजी करंजी येथील महामार्ग पोलीस केंद्रात नियुक्ती झाली होती. याठिकाणी कर्तव्यावर असताना १२ दिवसांनीच त्याची महाराष्ट्र पोलीस केंद्र तळसने (जि.रायगड) येथे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक झाली. त्यानंतर करंजी येथून ३० आॅगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी रायगड जिल्ह्यातील तळसने येथे जाण्यासाठी त्याला रवाना केल्याची माहिती करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक भरत कराळे यांनी दिली. तेथे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तावर असतानाच ताणतणाव आणि वातावरणातील बदलामुळे त्याची १२ सप्टेंबर रोजी अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने वासी (नवी मुंबई) येथील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. डेंग्यूसदृश्य आजाराने अनुपसिंहचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अनुपसिंहच्या मृत्यूची माहिती करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रावर धडकताच कर्मचाऱ्यांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले. मृत अनुपच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुले व जम्मू कश्मिर येथे आर्मीमध्ये सेवेत असलेले दोन भाऊ तसेच आप्त परिवार आहे. या घटनेने जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)