शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सावरगड कचरा व्यवस्थापन प्रकल्प हटविण्याची मागणी

By admin | Updated: August 12, 2014 00:11 IST

नगर परिषद क्षेत्रातील ओला व सुका कचरा सवरगड येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प डम्प केल्या जातो. या प्रकल्पामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पावसाळ््याच्या दिवसात

यवतमाळ : नगर परिषद क्षेत्रातील ओला व सुका कचरा सवरगड येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प डम्प केल्या जातो. या प्रकल्पामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पावसाळ््याच्या दिवसात याभागात राहणेही नकोशे होेते. तीन हजार लोकसंख्येच्या सावरगडचे आरोग्यच धोक्यात आले आहे. ही बाब वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला. त्यानंतर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरातून गोळा केलेला संपूर्ण कचरा सावरगड येथील घण कचरा व्यवस्थापन प्रकल्पावर टाकला जातो. सातत्याने कचऱ्याचे ढिगारे येथे जमा होतात. पावसाचे पाणी या कचऱ्यात मुरल्याने येथे डास, माश्या हे कीटक घोंघावतात. यापासून गावात कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय हा प्रकल्प उंच भागावर असल्याने कचऱ्यातील घाण झिरपून आजुबाजुच्या जलस्त्रोतात मिसळण्याची भिती आहे. काही दिवसातच येथील पाणी पुरवठ्याच्या बोअरचे पाणी दूषीत होण्याची शक्यताही ग्रामस्थांनी वर्तविली आहे. हा कचरा डेपो तयार करतानाच ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केला होता. मात्र त्यावेळी विविध पद्धतीचा दबाव आणून आंदोलन दडपण्यात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी पुन्हा रास्तारोको आंदोलन सुरू केले. त्यावेळी तत्कालिन आमदारांनी १५ दिवसांच्या आत या प्रश्नाचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरही कुठलाच तोडगा निघाला नाही. आता संपूर्ण ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याने अखेरचा लढा देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. या कचरा डेपोची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अथवा येथे रास्तारोको आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी सावरगडचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर नगरपरिषद काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)