शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

डीएड झालेली मुलगी कसते शेती

By admin | Updated: November 16, 2015 02:17 IST

शेतकऱ्याच्या मुलीने शिक्षका होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण वडिलांच्या आत्महत्येने घराचाच आधार गेला.

शेतीच झाली शाळा : वडिलांच्या आत्महत्येनंतर सांभाळले घरहरिओम बघेल आर्णी शेतकऱ्याच्या मुलीने शिक्षका होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण वडिलांच्या आत्महत्येने घराचाच आधार गेला. स्वप्नांचा चुराडा झाला. मुलगी एकाकी झाली पण खचली नाही. डीएड झाल्यावरही नोकरीची आस न बाळगता तिने वडिलांची शेती सांभाळली. स्वत: घाम गाळून तिने वडिलांची शेती आज सुधारली आहे. रूपाली राजेंद्र चहांदे असे त्या धाडसी मुलीचे नाव.तालुक्यातील केळझरा वरठी येथील शेतकरी राजेंद्र नथ्थुजी चहांदे (५०) यांनी २२ आॅक्टोबर २०१४ रोजी शेतातच सोयाबीनच्या गंजीशेजारी विष घेऊन आत्महत्या केली. नापिकी, कर्ज यामुळे ते विवंचनेत होते. त्यातच मुला-मुलीचे शिक्षण, अर्धवट राहिलेली विहीर, शासनाकडे रखडलेले पैसे अशा अनेक चिंता त्यांना छळत होत्या. त्यांच्या आत्महत्येला एक वर्ष उलटले. परंतु, या भागातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यापैकी कुणीही त्यांच्या कुटुंबीयांची दखल घेतली नाही. ही आत्महत्या शासन दरबारी ठरली, मात्र त्याचा आर्थिक लाभ अद्यापही या कुटुंबीयांच्या पदरी पडलेला नाही. परंतु, राजेंद्रच्या आत्महत्येनंतर पत्नी, मुलगी, मुलगा गरिबीशी झुंजत आहे. मुलगी रूपाली ही मोठी. तिने डीएड केले. लहान भाऊ दहावीत शिकत होता. रूपाली वडिलांच्या आत्महत्येनंतर चिंतेत होती. यातच आईला कॅन्सर झाला. कुटुंबाला आधार देण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, हा निर्धार रूपालीने केला. शेवटी शिक्षण सोडून शेतीच करायचा धाडसी निर्णय तिने घेतला. काहीही झाले तरी चालेल पण भावाचे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे, हाच रूपालीचा प्रयत्न आहे. आजारी आईला घराच्या चिंतेने घेरू नये, यासाठी रूपालीची अहोरात्र धडपड सुरू आहे. रूपाली स्वत: बैलगाडी चालवत शेतात जाते. दिवसभर उन्हातान्हात शेतात राबते. तिच्या मेहनतीतून आज शेतीचीही अवस्था सुधारत आहे. आई आणि भावाला ही आपण पोरके नसल्याचे वाटू लागले आहे. भाऊ आता तालुक्याच्या ठिकाणी आयटीआय करत आहे. आईला कॅन्सर असताना शेती सांभाळून रूपाली तिची शुश्रूषा करते. पुढे तिला शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. आपल्या संघर्षाविषयी सांगताना रूपालीचे डोळे भरून येतात. शिकलेली मुलगी असूनही रूपाली स्वत: शेती करत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रूपालीचे हे उदाहरण मार्गदर्शक आहे. आत्महत्या हा पर्याय नव्हे. माझ्या वडिलांनी केली. पण इतर कुणीही आत्महत्या करू नये, असे डबडबलेल्या डोळ्यांनी रूपाली सांगते. (शहर प्रतिनिधी)