शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

ऋणमुक्ती अभियानातून कर्जमाफी

By admin | Updated: May 18, 2016 02:44 IST

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी विदर्भात ऋणमुक्ती अभियान राबविले जात आहे.

१२ शेतकऱ्यांना दिलासा : थेट बँकेच्या खात्यात निधी जमायवतमाळ : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी विदर्भात ऋणमुक्ती अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १२ शेतकऱ्यांचे साडेतीन लाख रूपयांचे कर्ज फेडण्यात आले. याकरिता आपुलकी आणि जागृती संस्थेने पुढाकार घेतला. याचे धनादेश मंगळवारी शेतकरी कुटुंबांना बहाल करण्यात आले. पुण्यातील आपुलकी आणि जागृती या स्वयंसेवी संस्थेने विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. बिकट परिस्थिती असलेल्या अशा शेतकऱ्यांचा या संस्थेने शोध घेतला. पाच जिल्ह्यातील १२२ शेतकऱ्यांची त्यासाठी निवड करण्यात आली. या शेतकऱ्यांकडे ८६ लाख ८० हजार रूपयांचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड ‘आपुलकी’ मार्फत करण्यात येणार आहे.यामध्ये यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात २९ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम अदा करण्यात आली. यामध्ये यवतमाळ ८, अमरावती ७, वर्धा ८, अकोला ३ आणि वाशीमच्या ४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यातील १२ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात साडेतीन लाख रूपयांच्या कर्जाची रक्कम अदा करण्यात आली. यामध्ये भागीरथा चंद्रवंशी नागापूर ता. उमरेखड, द्रोपदा हाडे निंगनूर ता. उमरखेड, सूर्यवंशी हेमने रातचांदना ता. यवतमाळ, रामभाऊ कुमरे पिंप्री इजारा, सुजाता ढोले सायखेडा, बोरी येथील लक्ष्मीबाई माने यांचा समावेश आहे. तर वाशीम जिल्ह्यातील जांबरूनचे श्रीराम परांडे, मंगरूळपीरचे धर्माजी कांबडे यांचीही कर्जमुक्ती करण्यात आली.कर्जमाफी प्रमाणपत्रासह बँकेच्या नावाचा धनादेश शेतकऱ्यांना बहाल करण्यात आला. यावेळी आपुलकी संस्थेचे संयोजक अभिजित फाळके, जागृती संस्थेच्या संयोजिका मयुरी ढवळे, तहसीलदार सचिन शेजाळ, प्रयास संस्थेचे प्रशांत बनगीनवार, प्रगतशील शेतकरी आनंदराव सुभेदार, डॉ. प्रशांत चक्क रवार, कमल बागडी, मिलिंद फाळके, प्रकाश साबळे, संतोष अरसोड, प्रसाद नायगावकर, निखील जैत, मिथून मोंडे, गौरव नाईकर, गोपाल चव्हाण, विजय कदम आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)