शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
11
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
12
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
13
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
14
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
15
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
16
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
17
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
18
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
19
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
20
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

रुंझा, नांदुराच्या धोकादायक पुलांवरून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: August 5, 2016 02:19 IST

दीडशे वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांनी निर्माण केलेले शतकोत्तरी पुलांवरून आजही वाहतूक होत आहे.

शासनाचा मनाई आदेश : तरीही ब्रिटिशकालीन पुलांनाच नागरिकांची पसंती, पोलिसांनाही जुमानत नाहीत नरेश मानकर/ आरिफ अली पांढरकवडा/बाभूळगाव दीडशे वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांनी निर्माण केलेले शतकोत्तरी पुलांवरून आजही वाहतूक होत आहे. शासनाने बंदी घातल्यानंतरही वाहनधारकांची याच पुलाला पसंती आहे. पांढरकवडा तालुक्यातील रुंझा येथील पुलांवरून दररोज जीवघेणी वाहतूक होत आहे. तर बाभूळगाव तालुक्यातील नांदुराचा पूल अनेक जण उपयोगात आणतात. महाड येथील सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेने या पुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात ब्रिटिशांनी अनेक मजबूत पुलांची निर्मिती केली. त्यापैकीच एक पूल म्हणजे यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील रुंझा येथील पूल होय. १९०० ते १९१०च्या दरम्यान या पुलाचे बांधकाम झाल्याची आठवण जुने-जाणते सांगतात. ११६ वर्षाचा झालेला हा पूल आता अतिशय जीर्णय झाला आहे. कोणत्याही क्षणी पूल कोसळण्याची भीती आहे. अरुंद असलेल्या पुलावरील क्राँकीट उखडले असून बांधकामाला तडे गेले आहे. पुलावर सुरक्षा कठडेही नाही. हा पूल वापरण्यास योग्य नसल्याचे पत्र दहा वर्षापूर्वी ब्रिटीश सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले होते. त्यानंतर रुंझा येथे नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली. गावाच्या बाहेरुन ६०० मीटर लांबीचा बायपास काढण्यात आला. जवळपास एक कोटी दहा लाख रुपये खर्च करण्यात आले. आता जुना पूल बंद होईल आणि नवीन पुलावरून वाहतूक सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र बायपास रस्त्याचे काम काही दिवसातच उखडले. रस्ता एवढा निकृष्ट झाला की वाहन तर सोडा पायदळ चालणेही कठीण झाले. परिणामी वाहनधारकांनी आता ब्रिटिशकालीन पुलावरूनच वाहने हाकणे सुरू केले. बायपास रस्त्याच्या अवस्थेने वाहनधारक नाईलाजाने जुन्याच पुलावरून वाहने नेत आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीस बंद असल्याचे घोषित केले. परंतु आजही वाहनधारक याच रस्त्यावरून जीव धोक्यात घालून वाहने नेतात. त्यामुळे महाडसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. माघार कुणी घ्यावी यावरून व्हायची भांडणे बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथील बेंबळा नदीवर ब्रिटिशांनी १३८ वर्षापूर्वी पूल बांधला होता. लोखंडी साहित्याने बांधलेला हा पूल रेल्वेसाठी असावा असे जाणकार सांगतात. पूर्वी या अरुंद पुलावरून जाताना अनेक गंमती घडायच्या. मारामारीचे प्रसंग उभे रहायचे. पोलिसांना धाव घ्यावी लागायची. कारण या पुलावरून केवळ एकच वाहन जाऊ शकत होते. दुसरे वाहन समोरुन आले की, एका वाहनाला मागे घ्यावे लागत होते. यातून अनेक प्रसंग उद्भवले. धामणगाववरून मंत्र्यांचा ताफा येत होता त्यावेळी पुलाच्या दोनही बाजूला पोलीस तैनात केले जायचे. कापसाची बैलगाडी तर तासन्तास पुलाच्या कडेला उभी असायची. २००९ मध्ये या जुन्या पुलाच्या जवळच नवीन पूल बांधला. बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी कायमचा बंद केला. मात्र त्यानंतरही या जुन्या पुलावर वर्दळ कायम असते. बैलगाडी, दुचाकी, गुरेढोरे आणि पायदळही वाहतूक सुरूच असते. विजय दर्डा यांचे मानले आभार नांदुरा येथील अरूंद पुलामुळे विविध समस्या उद्भवत होत्या. ही बाब लक्षात येताच लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री टी.आर.बालू यांना नवीन पुलाची गरज पटवून दिली. त्यासाठी त्यांनी केंद्रीय निधी खेचून आणला. या पुलावर टोल टॅक्स लागू नये, अशी व्यवस्थाही विजय दर्डा यांनी निधी मंजूर करतानाच करून ठेवली. यानंतर १५ फेब्रुवारी २००७ रोजी जुन्या पुलालगत एकाचवेळी तीन ते चार वाहने जाऊ शकतील, अशा टोलेजंग पूल बांधकामाला सुरूवात झाली. १४ डिसेंबर २००८ रोजी नवीन पूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. यामुळे सर्व भांडण, तंटे बंद झाले. यामुळे परिसरातील नागरिकांनी विजय दर्डा यांचे पत्र पाठवून आभार मानले. हा नवीन पूल २४२ मीटर लांब, १०.५० मीटर रूंद आहे. पुलाला आठ पीलर आहेत. तीन पदरी पूल आहे. या पुलाला त्यावेळी आठ कोटी २० लाख रूपये बांधकाम खर्च आला.