शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना येथे विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू

By admin | Updated: May 19, 2016 02:01 IST

पाणीटंचाईमुळे कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या एका तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे

पाणी बळी : महिनाभरापासून भीषण पाणीटंचाईहिवरी : पाणीटंचाईमुळे कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या एका तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. गावात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई असून या पाणीटंचाईनेच तरुणीचा बळी घेतल्याचा आरोप गावकरी करीत होते. रत्नकला गणेश तितरे (१६) रा. अर्जुना असे मृत तरुणीचे नाव आहे. अर्जुना येथे गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गावापासून एक किलोमीटर अंतरावरील एका विहिरीवरून पाणी आणावे लागते. याच विहिरीचा उपयोग कपडे धुण्यासाठीही केला जातो. बुधवारी दुपारी रत्नकला आपल्या एका मैत्रिणीसह या शेतातील विहिरीवर गेली होती. कपडे धुण्यासाठी पाणी काढत असताना तिचा तोल गेला आणि २५ फूट खोल विहिरीत पडली. यानंतर तिची मैत्रीण धावत गावात आली आणि घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. गावकऱ्यांनी शेतातील विहिरीकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भगत, राजकुमार आडे यांनी घटनास्थळ गाठून गावकऱ्यांच्या मदतीने प्रेत बाहेर काढले. (वार्ताहर)गावकऱ्यांचा आरोप गावात भीषण पाणीटंचाई असतानाही ग्रामसेवक पाणीटंचाईकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना शेतातील विहिरीचा आधार घ्यावा लागतो. विहीर अधिग्रहण करण्यातही ग्रामसेवकाने कुचराई केल्याने आजचा हा प्रकार घडल्याचा आरोप गावकरी करीत होते. ज्या विहिरीला पाणी नाही ती विहीर अधिग्रहित केल्याचे घटनास्थळावर गावकरी सांगत होते.