शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवतीच्या मृत्यूने ‘प्रसव’ला हद्दीचा वाद

By admin | Updated: January 22, 2015 02:13 IST

आरोग्य शिबिरात उपचारार्थ दाखल असताना प्रकृती अत्यवस्थ होऊन एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.

प्रवीण पिन्नमवार पांढरकवडाआरोग्य शिबिरात उपचारार्थ दाखल असताना प्रकृती अत्यवस्थ होऊन एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेनंतर तिच्या पतीने डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हा प्रकार घडल्याचा आरोप करीत पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न चालविला. मात्र तीनही पोलीस ठाण्यांनी हद्दीचा वाद पुढे करून तक्रार स्वीकारली नाही. आता नेमकी हद्द कुणाची हा तिढा कायम ठेवत चेंडू वणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे टोलविण्यात आला. या घटनेवरून पोलीस खरेच संवेदनहीन असल्याचा प्रत्यय येतो. रजिता दिनेश सिडाम (१९) रा. निमनी ता. झरी असे मृत गर्भवतीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचा एक पाय दुखत होता. त्यामुळे १९ जानेवारीला तिला पती दिनेश सिडाम याने झरी येथील आरोग्य उपकेंद्रात आयोजित आरोग्य शिबिरात उपचारासाठी नेले. यावेळी तपासणी करून डॉक्टरांनी तिला उपचारार्थ दाखल करून घेतले. काही काळ औषधोपचार झाल्यानंतर सायंकाळी तिला अत्यवस्थ वाटू लागले. याची कल्पना डॉक्टरांना देण्यात आली. फेर तपासणी करून डॉक्टरांनी पुन्हा उपचार चालविले. मात्र रात्री तिची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे डॉक्टरांंनी तिला पुढील उपचारासाठी पांढरकवडा येथे हलविण्यास सांगितले. रुग्णवाहिकेतून पांढरकवडा येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर पती दिनेश याने पांढरकवडा पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने पत्नी रजिताचा मृत्यू झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र हद्दीचे कारण पुढे करून त्यांनी केवळ अकस्मात घटनेची नोंद केली. त्यामुळे झरी हे ठिकाण येत असलेले मुकुटबन पोलीस ठाणे गाठले. तेथील ठाणेदारांनी तिचा मृत्यू पांढरकवडा ठाण्याच्या हद्दीत झाला, असे कारण पुढे करून गुन्हा नोंदविण्याचे टाळले. त्यानंतर दिनेशने पाटण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेही हद्दीचेच कारण पुढे करण्यात आले. तेव्हा दिनेश आणि त्याच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत नेमकी कुठली हद्द ते आपसात ठरवून घ्या आणि आमची तक्रार नोंदवा, असा पवित्रा घेतला. तेव्हा तीनही ठाण्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये हद्दीवरून तू-तू-मै-मै झाली. त्यामुळे अद्यापही हा तिढा सुटला नाही. शेवटी हद्द ठरविण्यासाठी वणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला रजिताच्या नातेवाईकांना देण्यात आला. गर्भवती असताना चक्क आरोग्य शिबिरातच कुणाचा मृत्यू व्हावा ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या घटनेचे वास्तव पुढे येणे गरजेचे आहे. गुन्ह्यांचा आलेख वाढू नये म्हणून या घटना दडपल्या जातात.