लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : पूर्वीचा पुसद-मांडवी राज्य महामार्ग असलेला मार्ग पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. यामुळे गुंज ते खडका मार्गावर वाहनचालकांना कसरत करावी लागते. या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न निर्माण झाला आहे.या मार्गावर खड्डे पडल्याने खडका, शिरपूर, चिलगव्हाण, करंजी येथील नागरिक त्रस्त झाले आहे. या मार्गावर अनेकदा डागडुजी केली गेली. त्यावर लाखो रुपये खर्च झाले. परंतु रस्त्याची जराही परिस्थिती सुधारली नाही. विशेष म्हणजे हा पुसद ते श्रीक्षेत्र माहूर जाणार मुख्य मार्ग आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक याच मार्गाने माहूरला ये-जा करतात. मात्र रस्त्याची दुरवस्था पाहून एकदा आलेले भाविक दुसऱ्यांदा या मार्गाने येण्यास धजावत नाही. परिणामी परिसरातील अनेक व्यवसायांना फटका बसत आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने अनेकदा वाहने नादुरुस्त होतात.
गुंज-खडका राज्यमार्गाची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST