शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कवडीमोल आयुष्याभोवती दोस्तांचा काफिला

By admin | Updated: March 29, 2017 00:25 IST

नातेवाईकांनी नाकारलेला, समाजाने झिडकारलेला आणि वैद्यकीय यंत्रणेनेही अव्हेरलेला पांढरकवड्याचा ७५ वर्षांचा ‘कवडू’ अखेर वृद्धाश्रमात पोहोचला.

डोंगरेंचा आधार : पांढरकवड्याच्या रस्त्यावरचा ‘कवडू’ अखेर वृद्धाश्रमात यवतमाळ : नातेवाईकांनी नाकारलेला, समाजाने झिडकारलेला आणि वैद्यकीय यंत्रणेनेही अव्हेरलेला पांढरकवड्याचा ७५ वर्षांचा ‘कवडू’ अखेर वृद्धाश्रमात पोहोचला. तिथे आपल्यासारखेच ‘लेकरांनी’ नाकारलेले वृद्ध सोबती मिळाल्याने शारीरिक वेदना सोसण्याची ताकद कवडूला मिळाली आहे. ‘लोकमत’ने ७ मार्च रोजी कवडूची कडवट कहाणी प्रकाशित केली होती. ‘बाईचं काळीज... परक्या वृद्धालाही देते बापाची माया’ हे वृत्त प्रकाशित होताच समाज मदतीसाठी सरसावला. पण ज्या वैद्यकीय उपचारांची खरी गरज होती, ती शक्य झाली नाही. पांढरकवड्यातील माया मडावी, दुर्गा मडावी, नम्रता मडावी, हरीप्रसाद शर्मा यांनी या वृद्धाला यवतमाळात आणले. एका खासगी डॉक्टरने आधी उपचार करतो असा शब्द दिला. मात्र नंतर हा कवडूला शासकीय रूग्णालयात पाठवून दिले. तिथेही पहिला दिवस चांगला गेला. नंतर उपचार थांबवून या पेशंटला परत घेऊन जा, अशा धोशा लावण्यात आला. अखेर २६ मार्चला कवडूला शेषराव डोंगरे यांच्या वृद्धाश्रमात पोहोचविण्यात आले. तेथे पोहोचता क्षणी तेथील वृद्धांचा कवडू भोवती गोतावळा जमला. (स्थानिक प्रतिनिधी)