शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराच्या हल्ल्यात दहेलीचा शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:15 IST

दारव्हा आणि बाभूळगाव तालुक्यात शुक्रवारी रानडुकराने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी ठार, तर तीन जण जखमी झाले.

ठळक मुद्देतीन जखमी : दारव्हाच्या अंबिकानगरात शिरलेले डुक्कर पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा/बाभूळगाव : दारव्हा आणि बाभूळगाव तालुक्यात शुक्रवारी रानडुकराने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी ठार, तर तीन जण जखमी झाले. रानडुकरांच्या हैदोसामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर दहशतीत सापडले आहे.बाबाराव रामजी राठोड (५०) रा. दहेली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दहेली येथील बाबाराव राठोड रामगाव शिवारातील शेतातून बैल चारण्याकरीता गेले होते. झुडपात लपून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. गावकºयांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी शेताकडे धाव घेतली. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून बाबाराव राठोड यांना दारव्हा येथे उपचारासाठी आणण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दुसºया घटनेतील दारव्हा तालुक्यातील उमरी येथील शेतकरी नारायण राठोड (५८) रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. ते शेतात कपाशी काढण्यासाठी गेले असताना रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सायंकाळी ५ वाजतच्या सुमारास एका रानडुकराने दारव्हा शहरातही धुमाकूळ घातला. शहरातील अंबिकानगरात घुसलेल्या रानडुकराने एका महिलेला जखमी केले. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. नागरिक सैरावैरा पळत होते. या घटनेची वनविभागाला माहिती कळताच वनविभाग व पोलीस अधिकारी ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. संतोष पवार, सुधीर पवार व त्यांच्या दोन सहकाºयांनी नागरिकांच्या मदतीने जीव धोक्यात घालून रानडुकराला पकडले.बाभूळगावात वृद्ध जखमीशुक्रवारी दुपारी एक रानडुकर बाभूळगाव शहरातील शिवाजी चौकात घुसले. तेथे बसून असलेल्या जगन मंगल खडसन (६०) यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर रानडुकर वाट मिळेल तिकडे पळत सुटले. या गडबडीत अनेक दुचाकीस्वार खाली पडले. एका रानडुकराने अंगणात बांधून असलेल्या वासरालाही जखमी केले. अखेर सावंगी रस्त्याने पळत जाणारे रानडुकर शेतशिवारात निघून गेले. जखमी खडसन यांच्या छाती, हात, पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना प्रथम बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालय व नंतर यवतमाळ येथे हलविण्यात आले.रानडुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेशदारव्हा तालुक्यात रानडुकराने धुमाकूळ घातला असून आठवडाभरात तिघांवर हल्ला झाला. यात दोघांना जीव गमवावा लागला. या घटनेची दखल घेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी मुख्य वनसंरक्षक व वन अधिकाºयांना या रानडुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. सध्या ना. राठोड विधिमंडळाच्या अधिवेशनात व्यक्त आहे. मात्र घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माहिती दिली. तसेच यवतमाळ येथील वन विभागाच्या अधिकाºयांनी तत्काळ दारव्हा येथे भेट परिस्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले.