शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

‘गो ग्रीन’ला ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: January 21, 2017 01:24 IST

महावितरणचे वीजबिल आॅनलाईन भरण्याकडे आता वीज ग्राहकांचा ओढा वाढला आहे. लाखो वीजग्राहक आॅनलाईन वीज बिलाचा भरणा करीत आहेत.

आॅनलाईनला पसंती : ई-मेलवरील बिलाकडे फिरविली पाठ सुहास सुपासे   यवतमाळ महावितरणचे वीजबिल आॅनलाईन भरण्याकडे आता वीज ग्राहकांचा ओढा वाढला आहे. लाखो वीजग्राहक आॅनलाईन वीज बिलाचा भरणा करीत आहेत. परंतु, पर्यावरणपूरक अशा महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेला आवश्यक प्रतिसाद मिळत नाही. महावितरणने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेची अद्यापही ग्राहकांना माहिती नाही. वीज ग्राहकांना कागदी बिल न पाठविता त्यांना दर महिन्याच्या वीज बिलाची प्रत ई-मेलद्वारे पाठविणे यातून कागद वाचवून पर्यावरणाचे संवर्धन करणे ही संकल्पना म्हणजेच ‘गो ग्रीन’ योजना आहे. उल्लेखनीय म्हणजे या पेपरलेस योजनेचा लाभ घेऊन पर्यावरण रक्षणात योगदान देणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक बिलात तीन रुपये सुट महावितरणकडून देण्यात येते. तरीदेखील ग्राहकांचा योजनेला प्रतिसाद नाही. कारण बहुतांश ग्राहकांना ही योजनाच माहीत नसल्याचे अनेकांनी सांगितले. या उपक्रमाबाबत यवतमाळ महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता, तेदेखील अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यांनी लेखापालाशी संपर्क साधण्यास सांगितले. या योजनेअंतर्गत वीजग्राहकांना ई-मेलद्वारा वीजदेयके पाठविण्यात येतात. त्यामुळे बिलाच्या छपाईसाठी लागणारा कागद, तसेच बिल वाटपासाठी येणाऱ्या खर्चात महावितरणची बचत होऊ शकते. सोबतच पर्यावरण संवर्धनासही मदत होते. त्यातही ग्राहकाला बिल हवेच असल्यास ई-मेलद्वारे आलेल्या बिलाची प्रिंट काढून ग्राहक कोणत्याही बिल भरणा केंद्रावर बिल भरू शकतात. तसेच त्याची प्रतही स्वत:कडे ठेवू शकतात. घरगुती वीज ग्राहकांची एकूण संख्या जवळपास पावणे नऊ लाखांच्या घरात आहे. परंतु, गो ग्रीनमध्ये सहभागी झालेले ग्राहक अमरावती जिल्ह्यात केवळ ३१ व यवतमाळ जिल्ह्यात केवळ सात आहेत.