शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान चालीसा पठनासाठी गर्दी

By admin | Updated: April 12, 2017 00:05 IST

हनुमान जयंती दिनी हनुमान भक्तांनी एकत्र येत हनुमान चालीसाचा सवालाख जप केला. शेकडो भाविकांनी एकाचवेळी हनुमान चालीसा पठनाची यवतमाळातील ही पहिलीच वेळ.

१०१ किलोचा लाडू : सामाजिक प्रबोधनावर भरयवतमाळ : हनुमान जयंती दिनी हनुमान भक्तांनी एकत्र येत हनुमान चालीसाचा सवालाख जप केला. शेकडो भाविकांनी एकाचवेळी हनुमान चालीसा पठनाची यवतमाळातील ही पहिलीच वेळ. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी शहरासह लगतच्या भागातील भाविकांनी गोरक्षण संस्थानमध्ये मंगळवारी एकच गर्दी केली होती. येथील गोरक्षण संस्थानमध्ये सुमती मंडळ, वैदेही मंडळ व रामायण मंडळाच्या संयुक्तवतीने सव्वालाख हनुमान चालीसा पठनाचे आयोजन करण्यात आले. याकरिता गोंदियाचे गायक माधव गारसे व चमू यवतमाळात दाखल झाली. त्यांच्या नेतृत्वात दुपारी ३ वाजता सुरू झालेले हे पठन सायंकाळी ७ वाजता समाप्त झाले. आयोजकांनी भाविकांना हनुमान चालीसा व नारळांचे वितरण केले. या ठिकाणी साकारण्यात आलेला राम दरबार, नारळाचा पर्वत आणि गोमाता देखावा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गो संरक्षणचा संदेश यातून देण्यात आला. गोरक्षण संस्थानचे नंदलाल बागडी, अनिल अटल, ब्रिजमोहन भरतीया, किसनलाल सिंघानिया, रमेशभाई मजेठीया यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. स्थानिक हनुमान आखाडा चौकातही हनुमान जयंती उत्सव साजरा केला जात आहे. भक्तांच्या वैचारिक प्रबोधनासाठी येथे किर्तनांची व्याख्यानमाला घेण्यात आली. हनुमान जयंतीच्या पूर्व संध्येला बाल किर्तनकार ह.भ.प. सई पंचभाई यांनी ‘हनुमानाची भक्ती’ या विषयावर विमोचन केले. मंगळवारी सुंदरकांड कार्यक्रम झाला. येथे १०१ किलो वजनाचा मेव्याचा लाडू रमेश यादव, सचिन जाधव, मुरली पवार यांनी हनुमंताच्या चरणी अर्पण केला. यावेळी बजरंग दलाचे विदर्भ प्रांत प्रमुख अटलबिहारी पांडे उपस्थित होते.संकट विमोचन मंदिरात मंगळवारी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या. येथे भक्तांची सर्वाधिक गर्दी होती. ढुमणापूर, वनवासी मारूती, वाघापूर मार्गावरील रिंंगरोड परिसरातील मंदिरात महाप्रसाद वितरित करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यातीेल विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. (शहर वार्ताहर)