शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोहारातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा

By admin | Updated: July 31, 2016 01:16 IST

लोहारा येथील देवीनगरातील मुलीने तीन महिन्यापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

यवतमाळ : लोहारा येथील देवीनगरातील मुलीने तीन महिन्यापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नर्सिंग अभ्यासक्रमाला असलेल्या या तरुणीला तिच्या गावातीलच युवकाकडून मानसिक त्रास दिल्याची बाब उघड झाली. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून युवकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. प्रतीक्षा नारायण कोवे (१९) या तरुणीने २६ एप्रिल रोजी रात्री दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार तिची आई मंगला नारायण कोवे यांना २७ एप्रिलच्या सकाळी निदर्शनास आला. त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. नंतर प्रतीक्षाच्या मोबाईलवर रुढा (ता.कळंब) येथील मनीष येडमे याचे सातत्याने कॉल आढळून आले. आत्महत्येपूर्वी प्रतीक्षाने मनीषकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रतीक्षाचे मामा संजय उईके यांनी मनीषला समजाविले. त्यानंतरही मनीषकडून प्रतीक्षाला त्रास देण्यात येत होता. या जाचाला कंटाळूनच प्रतीक्षाने आत्महत्या केल्याची तक्रार मंगला कोवे यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात केली. यावरून आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला (कार्यालय प्रतिनिधी)