शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

परसबागेत फुलझाडे, सेंद्रीय भाजीपाल्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:46 IST

येथील गजानन महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या वानखडे दाम्पत्याने घराचे अंगण, आजूबाजूची जागा एवढेच नव्हेतर छतावर परसबाग तयार करून त्यामध्ये सेंद्रीय पद्धतीने विविध फुलझाडे व भाजीपाल्याची निर्मिती केली.

ठळक मुद्देवानखडे दाम्पत्याचा प्रेरणादायी उपक्रम : ओल्या, सुक्या कचऱ्याची घरातच विल्हेवाट

मुकेश इंगोले ।आॅनलाईन लोकमतदारव्हा : येथील गजानन महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या वानखडे दाम्पत्याने घराचे अंगण, आजूबाजूची जागा एवढेच नव्हेतर छतावर परसबाग तयार करून त्यामध्ये सेंद्रीय पद्धतीने विविध फुलझाडे व भाजीपाल्याची निर्मिती केली.छोटासा गांडूळ खत प्रकल्प तयार केला आहे. त्यामुळे ओल्या, सुक्या कचऱ्याची विल्हेवाट घरातच लावल्या जाते. डासांचा त्रास नाही. सर्वत्र हिरवळ असल्याने वातावरण प्रसन्न राहते. शिवाय घरच्या घरी सेंद्रीय भाजीपाला तयार होतो, असे सर्व फायदे असल्यामुळे या कुटुंबाचा हा उपक्रम प्रेरणा देणारा ठरला आहे. येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे प्रा.अतुल वानखडे यांना सुरुवातीपासूनच या कार्याची आवड आहे. त्यात त्यांना एमएस्सी कृषी शिक्षण घेतलेल्या पत्नी भावनातार्इंची साथ मिळाली आणि या दोघांचा उत्साह व मेहनीतून सुंदर अशी परसबाग तयार झाली. घराच्या अंगणात जागा करून तसेच कुंड्यांमध्ये विविध प्रकारची देशी, विदेशी शोभिवंत फुलझाडे लावण्यात आली. त्यामध्ये शेवंती, कोलीअस, अ‍ॅन्शेरियम, गॅलेरडीया, जरनेरा, अ‍ॅडोनियम, मोगरा, ग्लॅडिओली, डेहेलिया, सकुलंट, हँगीग प्लँन्टस, अ‍ॅरिला क्रोटान यासह इतर शोभेच्या व फुलांच्या झाडांचा समावेश आहे. त्यांनी घराच्या छतावर शेड तयार करून भाजीपाल्याची लागवड केली. काही जागेवर वाफे केले. टाकावू वस्तूंचा वापर करून भाज्यांची लागवड केली. वांगी, टोमॅटो, मिरची, कांदा, मेथी, पालक, भेंडी, सांभार, शेपू, फुलकोबी, वालाच्या शेंगा, लवकी, काकडी, कारले तर रताळ, गाजाराचे उत्पन्न घेतल्या जाते. यावर रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. शंभर टक्के सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला पिकविला जातो. त्यासाठी गांडूळ खत तयार केले जाते. यामुळे फुलझाडे व भाजीपाल्याकरिता खत मिळते. घरातील कचरा, झाडांची पाने यांची विल्हेवाट लागते तर सुका कचरा जाळला जातो. त्यामुळे या घरातून कचºयाचा कणसुद्धा बाहेर जात नाही. सर्वत्र स्वच्छता असल्याने डास तयार होत नाही. अंगण व छतावरील झाडांमुळे वातावरण थंड राहते. प्रसन्न वाटते. विशेष म्हणजे छतावरील शेड सोडले तर कोणत्याही प्रकारचा खर्च नाही. जास्तीत जास्त टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे.पालिकेला प्रेरणादायीनगरपरिषदेच्या शहर स्वच्छता अभियानात मोलाची कामगिरी बजावू शकेल असा हा वानखडे दाम्पत्याचा उपक्रम आहे. त्यामुळे प्रशासन व नागरिकांनी यातून प्रेरणा घेऊन शहराच्या सौंदर्यात भर घातली पाहिजे.