शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वाढोणा येथे कापूस व्यापाऱ्यांची मनमानी

By admin | Updated: April 1, 2017 00:35 IST

कापूस व्यापाऱ्यांची मनमानी सुरू असल्याने परिसरातील कापूस उत्पादक त्रस्त झालेले आहेत.

मंगेश चवरडोल   किन्ही (जवादे) कापूस व्यापाऱ्यांची मनमानी सुरू असल्याने परिसरातील कापूस उत्पादक त्रस्त झालेले आहेत. विविध कारणे पुढे करून क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपये कमी देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. रिधोरा येथील शेतकरी दीपक पवार, लोणबले, यंगारे हे वाढोणा बाजार येथील विमल अ‍ॅग्रो जिनिंगमध्ये कापूस विकण्यासाठी गेले होते. त्यांच्या कापसाला चार हजार ६०० ते चार हजार ९०० रुपये दर दिला जाईल, असे सांगण्यात आले. कापसावर पाणी मारून आहे, असे त्यांना सांगण्यात आले. प्रत्यक्ष कापसाचा दर पाच हजार ६०० ते पाच हजार ८०० रुपये आहे. शेवटी या शेतकऱ्यांना उद्धट वागणूक देऊन परत पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या कापसावर पाणी मारले असल्याचा आरोप केला जातो. दुसरीकडे याच जिनिंगमध्ये मोटर लावून कापसावर पाणी मारले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. सदर प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. रिधोरा येथील शेतकरी दीपक पवार यांनी आपल्या कापसाला चार हजार ८०० रुपये दर दिल्याचे सांगितले. कापसू पाण्याचा असल्याचा आरोप करण्यात आल्याचे ते म्हणाले.