शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कराराची थकबाकी २० पासून

By admin | Updated: August 13, 2014 00:01 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कामगारांना २० आॅगस्टपासून कराराच्या थकबाकीचे वाटप केले जाणार आहे. मंगळवारी एसटीचे अधिकारी आणि कामगार नेत्यांमध्ये झालेल्या

एसटी कामगार : मंगळवारी झाला निर्णय, २०० कोटींचे वाटपयवतमाळ : महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कामगारांना २० आॅगस्टपासून कराराच्या थकबाकीचे वाटप केले जाणार आहे. मंगळवारी एसटीचे अधिकारी आणि कामगार नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. थकबाकीपोटी कामगारांना सहा हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळणार आहे.एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, जनरल सेके्रटरी हनुमंतराव ताटे आदींशी झालेल्या चर्चेअंती थकबाकी वाटपाचा निर्णय झाला असल्याचे यवतमाळ विभागीय सचिव सदाशिव शिवणकर यांनी सांगितले. देय रकमेपैकी ५०० कोटी रुपये एसटीला देण्याचे शासनाने मान्य करत थकबाकीचा निर्णय महामंडळाच्या पातळीवर घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. १८ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एसटी अधिकाऱ्यांमध्ये मंत्रालयात बैठक झाली. यात विविध प्रश्नांवर चर्चा आणि निर्णय घेण्यात आले. यानंतर ६ आॅगस्टला परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. यातही विविध प्रश्नांसह कराराची थकबाकी अदा करण्यासाठी ५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार थकबाकीपोटी २०० कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. (वार्ताहर)१४ आॅगस्टला ‘इंटक’चे धरणे‘चले जाव’ आणि निदर्शने आंदोलनाची दखल घेत एसटी कामगारांना थकबाकी वाटपाचा निर्णय घेतला. मात्र एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) आग्रही आहे. यासाठी राज्यभर एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर १४ आॅगस्टला निदर्शने केली जाणार असल्याचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. कराराच्या थकबाकीपोटी महामंडळाला २६५ कोटी द्यावे लागणार आहे. परंतु एसटी कामगारांचे पगार शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहे. त्यामुळे औद्योगिक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करावा आणि एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढीचा नवीन करार करावा यासाठी प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष छाजेड यांनी दिला आहे.