शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कंत्राटदाराच्या मृत्यूने दीड तास चक्काजाम

By admin | Updated: August 26, 2014 23:44 IST

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर त्याच्यासोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे मंगळवारी सकाळी घडली.

बोरी अरब : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर त्याच्यासोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे मंगळवारी सकाळी घडली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यावर ठेऊन तब्बल दीड तास चक्काजाम केला. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शेख कलीम शेख फरीद (४२) रा. बोरी अरब असे मृताचे नाव आहे. तर त्याचा नातेवाईक शेख तौकीर शेख तन्वीर (३) हा गंभीर जखमी झाला. बांधकाम कंत्राटदार असलेला शेख कलीम दुचाकी (क्र. एमएच २९ झेड ६१५२) ने दारव्हा येथे जात होता. बोरी अरब येथील अडाण नदीवरील पूल पार केल्यानंतर टागोर विद्या मंदिरा समोर समोरून येणाऱ्या एसटी बसने (एमएच ४०-८१३८) सकाळी ८.३० वाजता जबर धडक दिली. यात शेख कलीमच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला शेख तौकीर हा गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ व नंतर नागपूरच्या रूग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान एसटीचालक बससह तेथून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. दारव्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. त्यानंतर दारव्हा येथे उत्तरीय तपासणी होऊन मृतदेह बोरीअरब येथे आणला. मात्र यावेळी संतप्त नागरिकांनी एसटी चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी करीत मृतदेह बसस्थानकासमोर ठेवला. चक्काजाम करून वाहतूक रोखून धरली. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. शेवटी दारव्हा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी टावरे यांनी संतप्त नागरिकांची समजूत घातली. चालकाच्या अटकेचे आश्वासन दिले. त्यामुळे मृतदेह उचलण्यात आला, आणि वाहतूक सुरळीत झाली. शेख कलीमच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)