शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात काँग्रेसने बाजी मारली

By admin | Updated: February 24, 2017 02:37 IST

तालुक्यातील दोन जि.प. गट व पं. स.च्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने कुंभा-मार्डी व बोटोणी-वेगाव गटातील दोनही जागांवर यश प्राप्त केले,

गणात काँग्रेसला दोन जागा : शिवसेना, भाजपाला प्रत्येकी एक जागाअण्णाभाऊ कचाटे   मारेगावतालुक्यातील दोन जि.प. गट व पं. स.च्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने कुंभा-मार्डी व बोटोणी-वेगाव गटातील दोनही जागांवर यश प्राप्त केले, तर मार्डी व वेगाव गणात काँग्रेसचे दोन, तर कुंभा गणात शिवसेना व बोटोणी गणात भाजपाचा उमेदवार विजयी झाला.जिल्हा परिषदेचे दोन गट व पंचायत समितीच्या चार गणांसाठी झालेल्या निवडणुकीचा गुरूवारी निकाल घोषित झाला. यात बोटोणी-वेगाव गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनिल जनार्धन देरकर ७०७३ मते घेऊन विजयी झालेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे रमन डोये यांचा १७४६ मतांनी पराभव केला. येथे शिवसेना तिसऱ्या स्थानावर राहिली.बोटोणी गणातून भारतीय जनता पार्टीच्या सुनिता शंकर लालसरे ३१७० मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माया पेंदोर यांचा १४६ मतांनी पराभव केला. वेगाव गणातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शितल रवींद्र पोटे ३५९८ मते घेऊन विजयी झाल्यात. त्यांनी भाजपाच्या रूपाली विश्वजित गारघाटे यांचा १११७ मतांनी पराभव केला. संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रीत झालेल्या कुंभा-मार्डी गटातील वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसच्या अरूणा अरूण खंडाळकर ८३४८ मते घेऊन विजयी झाल्यात. त्यांनी शिवसेनेच्या डिमन टोंगे यांचा दोन हजार ९८५ मतांनी पराभव केला. कुंभा गणातून शिवसेनेचे संजय आवारी ३६२१ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती गजानन खापने यांचा ७१८ मतांनी पराभव केला. मार्डी गणातून काँग्रेसचे श्रीकृष्ण कुमरे ४४८४ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे विठ्ठल कोयचाडे यांचा २०२१ मतांनी पराभव केला.सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई म्हणूनच पाहिली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही, तर कुंभा, मार्डी गणात त्यांना उमेदवारही मिळाला नाही. यावेळी काँगे्रसचे गट एकत्र आल्यानेच त्यांना यश प्राप्त करता आल्याचे समजते. त्यामुळे इतर पक्षातील दिग्गजांना पराभवांना सामोरे जावे लागले. यात शिवसेना तालुका प्रमुख गजानन किन्हेकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, काँग्रेसचे विद्यमान उपसभापती गजानन खापने, भाजपाचे महामंत्री रमण डोये, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष माया पेंदोर यांना पराभव पत्करावा लागला. यापूर्वी पंचायत समितीमध्ये काँग्रेस दोन, शिवसेना दोन, असे पक्षीय बलाबल होते. यावेळी काँग्रेस दोन, शिवसेना एक, भाजपा एक, असे पक्षीय बलाबल राहणार आहे. त्यामुळे बहुमत कुणालाही नाही.