शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चेतना अभियानातील मदत वाटपात दुजाभाव

By admin | Updated: July 13, 2016 03:08 IST

बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात गावागावात संकटात असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत, मार्गदर्शन व दिलासा

समित्या निष्क्रिय : प्रशासन म्हणते, लेखी तक्रारी करा यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात गावागावात संकटात असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत, मार्गदर्शन व दिलासा मिळावा या हेतुने तब्बल १८४८ ग्रामसमित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. परंतु या समित्यांकडून मदत वाटपात दूजाभाव होत असल्याचा सूर आता ग्रामीण जनतेतून निघू लागला आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी शासनाकडून या दोन जिल्ह्यांमध्ये बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना गावातच सर्वप्रकारची मदत मिळावी, या हेतुने यवतमाळ जिल्ह्यात गावागावात १८४८ समित्या स्थापन करण्यात आल्या. या समितीचा अध्यक्ष सबंधित गावातील सरपंच व सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहत आहे. समितीमध्ये गावातील इतर नागरिकांचाही समावेश आहे. कोणत्याही गावात शेतकरी आत्महत्या होऊ नये, याची महत्वाची जबाबदारी त्या गावातील सबंधित समितीकडे आहे. गावातील कुण्याही नैराश्यग्रस्त शेतकऱ्याची माहिती काढून त्याला तातडीने आवश्यक ती आर्थिक, मानसिक मदत या समितीद्वारे करण्यात यावी, असे निर्देश आहेत. त्यासाठी प्रत्येक समितीला एक लाख रुपये खर्चाची मूभा देण्यात आली असून पैसेही त्यांच्या सुपूर्द करण्यात आले आहे. परंतु आता हे पैसे वाटपात समितीकडून दूजाभाव होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गावातीलच नागरिक तक्रारी करीत आहेत. आपल्या जवळच्या अथवा नातेवाईकांनाच समित्या पैसे वाटप करीत आहेत, त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहत आहे, तसेच ठरवून दिलेल्या निकषांची पायमल्ली करून या पैशाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. या समित्यांवर सबंधित गटविकास अधिकारी व इतरांचा पाहिजे तसा वॉच दिसून येत नाही. समित्यांच्या संपर्कात तालुका पातळीवरील अधिकारी नाहीत. त्यामुळे या समित्या नेमक्या काय करीत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटावर मोजण्याइतपत समित्या सोडल्या तर उर्वरित ग्राम समित्यांचे कामकाज ढेपाळले आहे. समित्यांच्या स्थापनेपासून किती व कोणत्या गरजू शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करण्यात आली याची माहितीसुद्धा उपलब्ध करून दिल्या गेली नाही. त्यामुळे शासनाने ज्या हेतुने बळीराजा चेतना अभियान यवतमाळ जिल्ह्यात राबविणे सुरू केले आहे, त्या हेतुलाच कुठेतरी हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)