शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सर्व बोंडअळीग्रस्तांना भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:17 IST

तालुक्यातील लोणबेहळ परिसरातील सर्वच गावे बोंडअळीच्या सर्वेक्षणातून वगळण्यात आली. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करून सर्व नुकसानग्रस्त शेतकºयांना बोंडअळीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : लोणबेहळ सर्कलमधील शेतकºयांची धडक

ऑनलाईन लोकमतआर्णी : तालुक्यातील लोणबेहळ परिसरातील सर्वच गावे बोंडअळीच्या सर्वेक्षणातून वगळण्यात आली. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करून सर्व नुकसानग्रस्त शेतकºयांना बोंडअळीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे यांच्या नेतृत्वात बुधवारी लोणबेहळ सर्कलमधील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. शेतकºयांसह परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. बोंडअळी सर्वेक्षणात मंडळातील सर्व गावे वगळण्यात आली. त्या सर्व गावांचा पुन्हा सर्वे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, ही प्रमुख मागणी यावेळी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली.गारपीट झाल्याने शेतकºयांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली नाही. यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून ही नोंद करण्यात यावी. यासोबतच लोणबेहळ येथील स्टेट बँक शाखा पूर्ववत लोणबेहळलाच सुरू करण्यात यावी, वनविभागाची जागा लोणबेहळ येथील जिल्हा परिषद शाळेला त्वरित हस्तांतरित करण्यात यावी, प्राथमिक आरोग्य केंद्राला भौतिक सुविधा पुरविण्यात याव्या, रेतीघाटामुळे रस्त्यांची होत असलेली दुरवस्था बघता खणीकर्म निधी देण्यात यावा, पारधी बेडा येथील पारधी समाजाच्या ताब्यातील जागा नियमानुकूल करून घरकुल देण्यात यावे, राणीधानोरा उपकेंद्राला निधी देण्यात यावा अशा विविध मागण्या जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आल्या.यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, दिलीप चौहाण, विकास खडसे, उमेश आचनवार, सरपंच शरद भगत, योगेश तिवारी, सरपंच दिनेश ठाकरे, पिंटू चौधरी, अरुण टाके आदी उपस्थित होते.