शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

जिल्हा परिषद शाळेत शिकलेला शुभम होणार कलेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:43 IST

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक स्वत:च्या मुलांना आपल्या शाळेत का शिकवित नाहीत? झाडून साऱ्या शिक्षणप्रेमींना पडणारा हा प्रश्न शुभमने पार खोडून काढला आहे. त्याचे आईबाबा ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते, त्याच कुर्लीच्या शाळेत त्यांनी शुभमला शिकवले.

ठळक मुद्देलोकसेवा परीक्षा उत्तीर्ण : घाटंजी तालुक्यात बालपण, दिग्रसमध्ये शिक्षण अन् यवतमाळात भाड्याचे घर

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक स्वत:च्या मुलांना आपल्या शाळेत का शिकवित नाहीत? झाडून साऱ्या शिक्षणप्रेमींना पडणारा हा प्रश्न शुभमने पार खोडून काढला आहे. त्याचे आईबाबा ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते, त्याच कुर्लीच्या शाळेत त्यांनी शुभमला शिकवले. अन् इतके शिकवले की, आता तो कलेक्टर होणार आहे! देशपातळीवरील यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला असून आयएएस कॅडर निवडले आहे. अवघ्या २३ व्या वर्षी जिल्हाधिकारी होणारा शुभम म्हणजे जिल्ह्यातील गुणवत्तेचे शुभलक्षणच.शुभम शुक्ला हे या भावी कलेक्टरचे नाव. वडील राजेश शुक्ला आणि आई प्रतिभा शुक्ला. दोघेही कुर्ली (ता. घाटंजी) या खेड्यात शिक्षक होते. त्यांच्या पोटी १६ एप्रिल १९९५ रोजी शुभमचा जन्म झाला. ज्या शाळेत आईबाबा शिकवित होते, त्याच शाळेत शुभम चौथीपर्यंत शिकला. तिथे पुढची शाळाच नव्हती. मध्यंतरी यवतमाळातील भाड्याच्या घरात शुभम राहिला. नंतर आईने शुभमला दिग्रसच्या सैनिकी शाळेत घातले. बालपणापासून अभ्यासाची तीव्र ओढ असलेला शुभम शाळेतल्या दरवर्षी वादविवाद स्पर्धेत पहिला यायचा. कबड्डी स्पर्धा हे तर त्याचे पॅशन होते. ‘शाळेतली अशी एकही स्पर्धा नव्हती की, ज्यात तो जिंकला नाही’ असे शुभमची आई अभिमानाने सांगते. पाचवी ते दहावी दिग्रसमध्ये शिकताना तो दहावीत ९५ टक्के गुणांसह मेरिट आला होता. त्यानंतर नागपुरात अकरावी-बारावी (विज्ञान) केले. बारावीतही ८५ टक्के मिळविले. त्यानंतर तू काय करणार, असे विचारताच शुभमने सांगितले मी यूपीएससीची तयारी करणार, त्यासाठी दिल्लीलाच जाणार. खेड्यात राहणारे आईबाबा म्हणाले, लांब जाऊ नको. त्याऐवजी पुण्याला जा. पण शुभमने जिद्द सोडली नाही. तो दिल्लीला गेला. आत्मराम सनातन कॉलेजमध्ये त्याने हिस्ट्री आॅनर विषय घेऊन बीएची पदवी घेतली. तर दुसरीकडे यूपीएससीची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात त्याला किंचित गुण कमी पडले. पण दुसºया प्रयत्नात त्याने मुख्य लेखी परीक्षा पास केलीय. गुरुवारीच या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांची यादी घोषित करण्यात आली. त्यात शुभमचे नाव पाहून शिक्षक असलेले त्याचे आईबाबा आनंदाने गदगदून गेले.शुभमची आई प्रतिभा सध्या रुढा (ता. कळंब) या दुर्गम गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. तर वडील राजेश हे नाकापार्डी (ता. यवतमाळ) जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. सकाळी जाणे आणि सायंकाळी ७ वाजता यवतमाळातील तिरुपती नगरातील घरी परतणे, हा त्यांचा नित्यक्रम. मुलाचे यश ऐकताच त्याचे संपूर्ण बालपण त्यांच्या डोळ्यापुढे तरळून गेले.आई, तुझी बदली मीच करेनकुर्लीच्या (ता. घाटंजी) जिल्हा परिषद शाळेत शिकणे आणि त्याच खेड्यात राहणे, हेच शुभमचे बालपण होते. पण अधिक शिकण्याच्या उर्मीने तो नेहमी आईला म्हणायचा, आपण यवतमाळात तरी राहू. पण आई म्हणायची, आमची बदली आमच्या हाती नसते. इथे नोकरी आहे म्हणून इथेच राहावे लागेल. एकदा छोट्याशा शुभमने आईला विचारले, कोण करत असते गं तुझी बदली? आई म्हणाली, ते मोठे आयएएस अधिकारी असतात. त्यावर शुभम म्हणाला होता, एक दिवस मीच आयएएस होईन आणि तुझी बदली मीच करेन. हे शब्द शब्दश: जरी खरे ठरणार नसले, तरी शुभम आज आयएएस कॅडर निवडून फेब्रुवारीत मुलाखतीला सामोरा जाणार आहे. एकंदर ५ हजार उमेदवारांतून केवळ १९०० विद्यार्थी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यात शुभमचा समावेश आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगcollectorजिल्हाधिकारी