शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्‍वर अभयारण्यातून अवैध तेंदूपत्ता संकलन

By admin | Updated: May 31, 2014 23:45 IST

लगतच्या टिपेश्‍वर अभयारण्यात विनापरवानगी फिरण्यासही मनाई असताना तेथून अवैधरित्या तेंदूपत्ता संकलन होत आहे. कंत्राटदार आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने होत असलेला हा प्रकार वरिष्ठांच्या

सुधाकर अक्कलवार - घाटंजीलगतच्या टिपेश्‍वर अभयारण्यात विनापरवानगी फिरण्यासही मनाई असताना तेथून अवैधरित्या तेंदूपत्ता संकलन होत आहे. कंत्राटदार आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने होत असलेला हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास येऊ नये या विषयी शंका उपस्थितीत केली जात आहे. घाटंजी आणि पांढरकवडा तालुका क्षेत्र असलेल्या टिपेश्‍वर अभयारण्य क्षेत्रातील संपत्ती आणि वन्यजीवांना कुठलाही धोका होवू नये यासाठी विविध प्रतिबंध घातले गेले आहे. या क्षेत्रात वसलेल्या गावांचे स्थानांतरण करण्यात आले. वनसंपत्तीला कुठलाही धोका होऊ नये, हा या मागील उद्देश आहे. यावर शासनाने लाखो रुपये खर्ची घातले आहे. तेंदूपत्ता कंत्राटदारांची मात्र मनमानी सुरू आहे. अभयारण्यापासून तीन किलोमीटर क्षेत्रात तेंदूपत्ता संकलन केंद्र असू नये असा शासन नियम आहे. मात्र कंत्राटदार उजाड गावांच्या नावाखाली संकलन केंद्र घेवून खुलेआम तेंदूपत्ता खरेदी करत आहे. अभयारण्यापासून हाकेच्या अंतरावरील जांब येथे खुलेआम तेंदूपत्ता आणला जात आहे. मजुरांचा तंदूपत्ता संकलनासाठी अभयारण्य क्षेत्रात खुलेआम संचार होत आहे. जांब बाजार केंद्रावर जवळपास तेंदूपत्ता अभयारण्यातूनच आणला जातो. परिणामी शासनाच्या संपत्तीला बाधा पोहोचत आहे. शिवाय वन्यप्राणी या परिसरातून दुसरीकडे कूच करत आहे. सदर बाब संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना माहीत असूनही ते कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान जांब येथील वनहक्क समितीचे सदस्य सैयद जावेद सैयद अमीर यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. मात्र अजूनही कुणावरही कारवाई झाली नाही. परिणामी सदर अभयारण्यातून अवैधरित्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरूच आहे.