शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

‘सीआयडी’ची दहशतच संपली

By admin | Updated: April 11, 2015 23:53 IST

सीआयडी अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ही राज्य शासनाची गंभीर गुन्ह्यांचा तपास करणारी महत्वाची एजन्सी आहे.

वर्षानुवर्षे चालतात तपास : नागरिकांच्याही भ्रमाचा फुटला भोपळा यवतमाळ : सीआयडी अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ही राज्य शासनाची गंभीर गुन्ह्यांचा तपास करणारी महत्वाची एजन्सी आहे. एकेकाळी सीआयडी म्हटले तरी भल्याभल्यांची पाचावर धारण बसायची. परंतु आता जणू सीआयडीची दहशतच संपली. केंद्रात सीबीआय आणि राज्यात सीआयडी ही ‘इन्व्हेस्टीगेशन’ची प्रमुख व्यवस्था आहे. पोलीस ठाण्यांच्या आवाक्याबाहेरील आणि मुंबईपर्यंत गाजलेल्या गुन्ह्यांचा तपास सीआयडीला सोपविला जातो. सामान्यांच्या नजरेत सीआयडीचे वेगळे महत्व आहे. म्हणूनच कुणालाही आपल्यावरील अन्यायाच्या गुन्ह्याचा तपास सीआयडीनेच करावा असे वाटते. काही वर्षापूर्वी ही बाब खरीही होती. परंतु आज सीआयडीबाबत नागरिकांच्या मनातील भ्रमाचा भोपळा फुटला आहे. सीआयडीची सध्या दैनावस्था झाली आहे. राज्य शासनाची गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची सर्वोच्च संस्था असूनही त्याकडे गृहखात्याचे लक्ष नाही.अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांनी ही संस्था पोखरली गेली आहे. तपासाला अधिकारीच नसल्याने फाईली वर्षानुवर्षे पडून आहेत. सीआयडी मार्फत तपास करावा, अशी मागणी करताना फारसे कुणी आता दिसत नाही. उलट एखाद्याला जाणकाराला प्रकरण थंडबस्त्यात टाकायचे असेल तरच तो सीआयडी तपासाची मागणी करू शकतो. कारण पोलीस ठाणे स्तरावर गुन्ह्याचा तपास झाल्यास त्यांना ६० ते ९० दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करावे लागते. परंतु सीआयडीला असे कोणतेही बंधन नाही. सीआयडीला प्रकरण हस्तांतरित झाल्यानंतर सुरुवातीची सहा महिने तर त्या फाईलकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. सीआयडीच्या अनेक कार्यालयांमध्ये आजही पूर्णवेळ अधिकारी नाही. केवळ कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन खानापूर्ती केली जात आहे. सर्व काही थंड झाल्यावर या तपासात काही निष्पन्न होत असेल का हा संशोधनाचा विषय आहे. सीआयडीकडे आलेल्या कित्येक प्रकरणांमध्ये फारशी प्रगती झाली नाही. आहे त्या अवस्थेतच अनेक प्रकरणे गुंडाळली गेली. वर्षानुवर्षे तपास करूनही काहीच निष्पन्न होत नसेल तर सीआयडीकडे तपासासाठी प्रकरणे द्यायचीच कशाला, असा कळीचा मुद्दा झाला आहे. यवतमाळच्या डेप्युटी आरटीओ कार्यालयातील ३८ ट्रकच्या बोगस पासिंगचे प्रकरण त्यासाठी सबळ पुरावा ठरत आहे. सन २००६ मध्ये यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी चौघांना अटक झाली होती. त्यानंतर सीआयडीने तब्बल नऊ वर्षे तपास केला. या काळात केवळ तीन आरोपींची भर पडली. आरटीओ यंत्रणेचा कोणताही दोष या पासिंगमध्ये सीआयडीला आढळून आला नाही, हे विशेष! अखेर सात आरोपींवर हे प्रकरण गुंडाळले गेले. आरटीओतील अधिकारी तर सोडाच संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यालासुध्दा सीआयडीचा धक्कासुध्दा लागला नाही. ते पाहता यवतमाळ सीआयडीने नऊ वर्षे नेमका काय तपास केला, हा आता पुण्याच्या पोलीस महासंचालकांसाठीच तपासाचा विषय ठरला आहे. सीआयडीची खरोखरच उपलब्धी किती, याचे चिंतन करण्याची वेळ गृह खात्यावर आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) रिक्त पदे आणि कासवगतीने पोखरलेसीआयडीची यंत्रणाही आपल्या कामाची गती मंदावल्याचे मान्य करते. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा, खर्चाच्या अनुदानाची अडचण, पुरेशी यंत्रणा नसताना प्रकरणांची वाढलेली संख्या आदी कारणे पुढे केली जातात. एखाद्या प्रकरणाचा संपूर्ण सोक्षमोक्ष लागल्यानंतर ते प्रकरण तपासासाठी सीआयडीला दिले जात असल्याची ओरड तेथील यंत्रणेकडून ऐकायला मिळते. ‘आम्हाला जुने मुर्दे उकरावे लागतात’ अशा शब्दात सीआयडीची यंत्रणा त्यांच्याकडे येणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासाला ‘ट्रीट’ करते. यावरून गुन्ह्यांच्या तपासाबाबत तेथील यंत्रणेची काय मानसिकता असेल याचीही कल्पना येते.