शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्या दारूतून बुडतोय लाखोंचा महसूल

By admin | Updated: October 29, 2014 22:55 IST

प्रमुख शहरांमध्ये अधिकृत कारखान्यात दारूची निर्मिती केली जाते. ही दारू चोरट्या (कर बुडवून) मार्गाने कारखान्याबाहेर काढली जाते. तसेच अवैध दारू विक्रेत्यांच्या माध्यमातून

यवतमाळ : प्रमुख शहरांमध्ये अधिकृत कारखान्यात दारूची निर्मिती केली जाते. ही दारू चोरट्या (कर बुडवून) मार्गाने कारखान्याबाहेर काढली जाते. तसेच अवैध दारू विक्रेत्यांच्या माध्यमातून या दारूची विक्री होते. जिल्ह्यात ही चोरटी दारू मोठ्या प्रमाणात विकली जात असून त्यातून शासनाचा लाखो रुपये महसूल महिन्याकाठी बुडतो. मात्र उत्पादन शुल्क विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष आहे. यवतमाळ जिल्ह्यात मांगुळ येथे देशी दारू निर्मितीचा केवळ एक कारखाना आहे. तेथे दारूची निर्मिती कमी प्रमाणात होत असल्याने परजिल्ह्यातील परवानाकृत कारखान्यात तयार झालेली देशी दारू जिल्ह्यात येते. नागपूर, अमरावती, औरंगाबाद आदी ठिकाणाहून ही दारू आयात केली जाते. विदेशी दारू नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक आदी जिल्ह्यातून आणली जाते. उत्पादन शुल्क कर भरल्याशिवाय दारू बाहेरच पडू शकत नाही. मात्र कारखान्यातील उत्पादन शुल्क अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चोरट्या मार्गाने दारू बाहेर काढली जाते. परवानाकृत वाईन शॉप आणि बारमध्ये अथवा देशी दारू चिल्लर विक्रीच्या दुकानात तपासणीदरम्यान ती आढळल्यास अनुज्ञाप्तीधारकावर कारवाई होते. त्यामुळे कुणीच चोरटी दारू विकण्याचा धोका पत्करत नाही. त्यामुळे ही दारू थेट गुत्यांवरून विकली जाते. प्रत्येकच ठाण्याला महिन्याकाठी अवैध दारू पकडण्याचे टार्गेट दिले जाते. वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी पोलिसांकडून हे टार्गेट पूर्ण केले जाते. त्यानंतर ही दारू बनावट आहे किंवा नाही, दारूचे उत्पादन शुल्क भरले आहे किंवा नाही, अवैध विक्रेत्याने ही दारू कुठून खरेदी केली हे जाणून घेण्यासाठी पॅकिंगवरील लॉट क्रमांकाचा दारूसाठा कुठल्या विक्रेत्याला कारखान्यातून देण्यात आला आदी बाबीचा अहवाल ते उत्पादन शुल्क कार्यालयाकडून मागवितात. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतरही हा अहवाल प्राप्त होत नाही. त्यातूनच मोठ्या प्रमाणात चोरट्या दारूची विक्री होत आहे. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नवलकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद दिला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)