शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

चौसाळाशिवारात डोळ्यात मिरची पूड फेकून लुटले

By admin | Updated: February 27, 2017 00:48 IST

चापडोह येथील दुचाकी चालकाला डोळ्यात मिरची फूड फेकून लुटण्यात आले. ही घटना शनिवारी दुपारी चौसाळा शिवारात घडली.

यवतमाळ : चापडोह येथील दुचाकी चालकाला डोळ्यात मिरची फूड फेकून लुटण्यात आले. ही घटना शनिवारी दुपारी चौसाळा शिवारात घडली. चापडोह (पुनर्वसन) येथील रहिवासी पंकज वसंत ढोक हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एम.एच.२९-के.ए.६५९१) यवतमाळ येथून किटाकापराकडे जात होते. कापरा मार्गावर चौसाळा शिवारात अचानक त्यांच्या दुचाकीसमोर दोन अज्ञात व्यक्ती आल्या. त्यांनी काही कळायच्या आत पंकजच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. यामुळे गांगरून गेलेला पंकज डोळे चोळत असताना अज्ञात दोन व्यक्तींनी त्याच्या खिशातील रोख २२ हजार रूपये, मतदान ओळखपत्र, एटीएम कार्ड, चालक परवाना आदी हिसकावून घेतले. यानंतर लगेच ते दोघेही तेथून पसार झाले. पंकजने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात दोघांविरूद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौसाळा शिवारात यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. या शिवारात भरदिवसाही वर्दळ अत्यंत कमी असते. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)