शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गावांपुढे ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमाचे आव्हान

By admin | Updated: August 26, 2014 00:16 IST

गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसावर आला आहे. गावागावात गणरायाची स्थापना केली जाते. मात्र एकाच गावात अनेक ठिकाणी गणरायाची स्थापना केली जाते. मात्र खेडे गावात शांतता राखण्याच्या

पुसद : गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसावर आला आहे. गावागावात गणरायाची स्थापना केली जाते. मात्र एकाच गावात अनेक ठिकाणी गणरायाची स्थापना केली जाते. मात्र खेडे गावात शांतता राखण्याच्या दृष्टीने ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविणे महत्वाचे आहे. गावागावात स्थापन झालेल्या तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेतल्यास एक गाव एक गणपती हा उपक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. गत सात वर्षात या मोहिमेला मोठे यशही मिळत आहे. गावातील तंटे गावात मिटवून शांतता व सुव्यवस्था निर्माण होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेचा मोठा ताण असतो. यासाठी तंटामुक्त समितीने पुढाकार घेण्याची गरज आहे. एका गावात एकच गणपती स्थापन केल्यास गावातील शांतता भंग होणार नाही. पुसद शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळ स्थापन केले जातात. गावागावात एकापेक्षा अधिक गणेश मंडळाची स्थापना होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घेऊन गावातील तरुणांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.गावात एकच गणपती असेल तर गटबाजी निर्माण होणार नाही, वाद-विवाद टाळले जातील. गावाची शांतताही भंग होणार नाही. परिणामी गावाची सामाजिक, सांस्कृतिक ओळख निर्माण होईल, यासाठी एक गाव एक गणपती यावर भर देण्याची गरज आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही लोकचळवळ आहे. या चळवळीची धुरा खांद्यावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांना गावात तंटामुक्तीसाठी उपाय करावयाचे आहे. त्यातीलच एक गाव एक गणपती हा महत्वाचा उपक्रम आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाला खंबीरपणे या तंटामुक्त समित्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. अनेक गावांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम सुरू केला आहे. यावर्षी आणखीन या उपक्रमात सहभागी होणाऱ्या गावांची संख्या निश्चितच वाढणार आहे. तंटामुक्त गाव समिती आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून प्रबोधनात्मक कार्यक्रमाने गावकऱ्यांचे मतपरिवर्तन होईल, यात कुणालाही शंका नाही. (प्रतिनिधी)