शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सचिवांकडून घेतली सीईओंनी प्रेरणा

By admin | Updated: May 29, 2014 02:53 IST

येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नुकताच एका आदिवासी गावात रात्रीचा मुक्काम

यवतमाळ : येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नुकताच एका आदिवासी गावात रात्रीचा मुक्काम ठोकून गावकर्‍यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. त्यानंतर मंगळवारी शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सीईओंना हा रात्रीचा मुक्काम बंधनकारक केला. राज्याचे मुख्य सचिव ज.स.सहारिया यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण मुक्कामाची योजना पूर्णत्वास नेल्याचे कलशेट्टी यांनी सांगितले.

प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या शुक्रवारी खुद्द जिल्हाधिकारी आणि सीईओ आता रात्रीला गावात मुक्कामी राहणार आहे. तसे आदेश मुख्य सचिवांनी मंगळवारीच जारी केले. खुद्द मुख्य सचिव ४ मे रोजी गावकर्‍यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी एका गावात मुक्कामी होते. त्यांच्या या मुक्कामातूनच मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांना प्रेरणा मिळाली. सचिवांच्या पावलावर पाऊल ठेवत कलशेट्टी यांनीही दुर्गम झरी तालुक्यातील पांढरवाणी गावात रात्रीचा मुक्काम ठोकला. जंगलाच्या शेजारी राहणार्‍या या गावात त्यांनी रात्री गावकर्‍यांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी जंगली श्‍वापदांची भीती, भारनियमन, पाणीटंचाई या समस्या त्यांना प्रकर्षाने जाणवल्या. काही महिन्यांपूर्वी सहारिया यांनी एका बैठकीमध्ये प्रशासनाने गावात मुक्काम ठोकण्याची कल्पना मांडली होती, तीच आपण उचलून धरल्याचे कलशेट्टी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (शहर वार्ताहर)