शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीआय’ कापूस खरेदी घोटाळ्याची अखेर ‘सीजीएम’मार्फत चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:46 IST

सीसीआयमधील (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) कोट्यवधी रुपयांच्या कापूस खरेदी घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश सीसीआयचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पी.के. अग्रवाल यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे‘सीएमडीं’ची माहिती राज्यभरातील अनेक ग्रेडर्स निशाण्यावर , दोषींवर कारवाई होणार

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सीसीआयमधील (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) कोट्यवधी रुपयांच्या कापूस खरेदी घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश सीसीआयचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पी.के. अग्रवाल यांनी दिले आहेत.पी.के. अग्रवाल (मुंबई) यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला सांगितले की, सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्यामार्फत सीसीआयच्या कापूस खरेदी घोटाळ्याची चौकशी केली जाईल. या चौकशीत जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.सीसीआयमधील कापूस खरेदी घोटाळ्याची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केली. त्याची दखल सीसीआयच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांवर ग्रेडर्स आणि जिनिंग-प्रेसिंग मालकांच्या तसेच व्यापाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. रूईमध्ये तीन किलोची घट दाखवून ‘मार्र्जिन’ ठेवली जात आहे. शेतकऱ्यांचा चांगला कापूस कमी दर्जाचा ठरवून सीसीआयकडून नाकारला जात आहे. शेतकरी मग नाईलाजाने हा कापूस अडीच ते तीन हजार रुपये क्विंटलने व्यापाऱ्यांना विकतो. व्यापारी हाच कापूस कुण्यातरी शेतकऱ्यांच्या सातबारावर दाखवून पुन्हा सीसीआयला विकतात. सीसीआयचे ग्रेडर ‘सेटिंग’मुळे हा कापूस डोळे लावून स्वीकारतात व त्याला प्रति क्विंटल साडेपाच हजारांचा भावही दिला जातो. या पद्धतीने शेतकऱ्यांना गंडविले जात आहे. आधीच नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सीसीआयच्या खरेदी केंद्रावर नागविले जात आहे.

विदर्भ, मराठवाडा, खान्देशपर्यंत व्याप्तीसीसीआयच्या कापूस खरेदीत राज्यात बहुतांश ठिकाणी घोटाळा आहे. शेतकऱ्यांच्या नाकारलेल्या कापसावर दोन ते अडीच हजारांची मार्जीन ठेवली जात आहे. त्यातूनच कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. सीसीआयच्या अकोला व औरंगाबाद झोन अंतर्गत येणाऱ्या विदर्भ, मराठवाडा, खान्देश या सर्वच भागातील खरेदी केंद्रांवर हा घोटाळा असल्याची माहिती आहे. मुख्य महाव्यवस्थापकांमार्फत होणाऱ्या या चौकशीत सीसीआयमधील अनेक ग्रेडर्सच्या कारनाम्यांचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जिनिंग-प्रेसिंग मालकांचाही पर्दाफाशया चौकशीत जिनिंग-प्रेसिंग मालकांची चलाखीही उघड होणार आहे. त्यांनी आपल्याकडील कमी दर्जाच्या कापसापासून बनलेल्या रूईगाठी सीसीआयमध्ये दिल्या असून तेथील चांगल्या दर्जाच्या गाठी आपल्याकडे घेतल्या आहेत. या अ‍ॅडजेस्टमेंटचीही चौकशी होणार आहे.

टॅग्स :cottonकापूस