शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: July 15, 2014 00:14 IST

राज्य शासनाकडून सिंचन वृद्धीसाठी राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि पाणलोट विकास यंत्रणा यामध्ये कंत्राटी तत्वावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.

यवतमाळ : राज्य शासनाकडून सिंचन वृद्धीसाठी राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि पाणलोट विकास यंत्रणा यामध्ये कंत्राटी तत्वावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना ११ महिन्याची नियुक्ती देऊन सेवा खंडित केली जाते. नंतर पुन्हा कामावर घेतले जाते. शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना नियमित करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दुपारी धरणे दिली. जिल्ह्यात पाणलोट व्यवस्थापनांतर्गत विविध पदांवर ६७ कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाकडून या कर्मचाऱ्यांना नऊ हजार ५०० रुपये मासिक वेतन दिले जाते. आजच्या महागाईत या वेतनामध्ये उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही. कृषी तज्ञ, उपजिविका तज्ञ, समूदाय संघटक, संगणक तज्ञ, तांत्रिक सहाय्यक, शिपाई, संगणक प्रशासक, कनिष्ठ अभियंता अशी अनेक पदे रिक्त आहेत. याच जागेवर सेवाज्येष्ठतेनुसार कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात यावी, मध्यप्रदेशमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये वेतन दिल्या जाते. तोच निकष महाराष्ट्र शासनाने लावावा. शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणीसह अन्य आर्थिक लाभ देण्यात यावे, एमसीईडी ऐवजी कृषी विभागामार्फतच सर्व कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती द्यावी, प्रवास भत्त्यासाठी पाच हजार रुपये प्रति महिना देण्यात यावे या मागण्यांसाठी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये किशोर हातमोडे, योगेश राऊत, सतीश पवार, जयश्री वानखडे, मधुसूदन रुपवने, किशोर अलोणे, किरण मुनेश्वर, जगदिश कुडमेथे, अर्चना काळे, प्रवीण धुळधुळे, चंदन अवजाडे, जितेश राठोड आदी कर्मचारी सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)