शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ बाजार समितीत व्यापाऱ्याची मनमानी

By admin | Updated: December 30, 2015 02:58 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर्णत: व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा क्रमवारीनेच लिलाव करणे अपेक्षित असताना ....

तुरीचे भाव पाडले : मुक्कामी शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव नाहीहिवरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर्णत: व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा क्रमवारीनेच लिलाव करणे अपेक्षित असताना व्यापारी मनात येईल तेथून मालांचा लिलाव करतात. सोमवारी सकाळी तुरी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा लिलावच केला नाही. मंगळवारीही दुपारी उशिरा त्याच दिवशी आलेल्या शेतमालाचा लिलाव केला. लिलाव करताना व्यापाऱ्यांनी तब्बल दीड हजार रुपयांनी तुरीचे भाव कमी केले आहे. यवतमाळ तालुक्यातील भांबराजा येथून विलास कोवरे, पुंडलिक राऊत, प्रकाश सोनकर, बारडतांडा येथून पंकज पवार, भारत जाधव, पिंपळगाव येथून मिलिंद गावंडे, लोणी येथून शिवलाल पवार, करळगाव येथून विश्वनाथ ठाकरे, मडकोना येथून शंकर गुल्ले, भास्कर धोटे, सुरज धोटे, रामचंद्र मेश्राम, विलास लोकासे, ईश्वर पेंदोर, बोरगाव लिंगा येथून श्रीकृष्ण घाटे, हरिशचंद्र ढोरे हे शेतकरी तूर विकण्यासाठी सोमवारी सकाळीच आठवड्याचा पहिलाच दिवस म्हणून बाजार समितीत आले. मात्र व्यापाऱ्यांनी त्या दिवशी त्यांच्या तुरीचा लिलावच केला नाही. शेतकऱ्यांनी जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देवून त्यांना परतवून लावले. मंगळवारी दुपारी लिलाव होणे अपेक्षित होता. मात्र याही दिवशी उशिरा ३ ते ४ वाजता लिलावाला सुरुवात केली. त्यातही सोमवारपासून मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना वगळून सुरुवातीला मंगळवारी आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचा लिलाव करण्यात आला. मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता जाणीवपूर्वक तुरीचे भाव कमी करण्यात आले. सोमवारपर्यंत नऊ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने जात असलेली तूर मंगळवारी चक्क आठ हजार ३७० रुपयाने खरेदी केली. एका दिवशी हजार ते १५०० रुपयांची तूट व्यापाऱ्यांनी आणली. बाजार समितीत प्रशासक नेमले असून त्यांच्याकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. येथील सचिव व कर्मचारीवर्गसुद्धा पूर्णत: व्यापारीधार्जीना आहे. अडते व व्यापाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्याचे काम या बाजार समितीत केले जात आहे. शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना कसे नाडवता येईल, याचाच पुरेपूर प्रयत्न येथील यंत्रणेकडून केला जातो. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील बाजार समितीत शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक नित्याचीच झालेली आहे. या बाबत तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. शेतमालाची खरेदी करताना अडते व व्यापारी आपल्या मर्जीनेच कारभार करतात. बाजार समितीत शेतकरी हितासाठी कोणतीच नियमावली नाही. यातूनच मोठी अनागोंदी येथे सुरू आहे, असा आरोप मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)