शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी येथे बौद्ध धम्म परिषद

By admin | Updated: May 31, 2014 23:46 IST

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्यावतीने तीन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. यात प्रबोधनपर कार्यक्रम, कविसंमेलन, एकपात्री नाट्यप्रयोग,

घाटंजी : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्यावतीने तीन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. यात प्रबोधनपर कार्यक्रम, कविसंमेलन, एकपात्री नाट्यप्रयोग, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा गौरव आदी कार्यक्रमांचा समावेश होता. परिषदेच्या दुसर्‍या दिवशीच्या सत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म चळवळीमुळे झालेला बदल या विषयावर भिक्खू संघांनी धम्मदेसना दिली. मिलिंद गुरुजी (कर्नाटक), एस.डी. डहाट (बंगलोर), गजभेजी (छत्तीसगड) आदींनी मार्गदर्शन केले. प्रा.अमित भगत, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संतोष जीवने, सुनील वेले यांनी अनुक्रमे प्रास्ताविक, संचालन आणि आभार मानले. दुसर्‍या सत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय बौद्ध महासभा स्थापनेमागील उद्देश व कार्य या विषयावर प्रा.ज्वाला देहाने प्रा.डॉ.सरिता कावळे यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष बी.के. बर्वे होते. संचालन प्रा.उत्तमराव शेंडे यांनी केले.तिसर्‍या दिवशीच्या सत्रात त्रिशरण पंचशील वंदना देऊन भन्तेंच्या हस्ते धम्मदेसना देण्यात आली. यानंतर कविसंमेलन आणि ‘मी रमाई बोलते’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. समारोपीय सत्राचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील होते. महासचिव व्ही.एस. मोकळे, जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने, शंकरराव ढेंगळे, देवानंद शेळके, गोविंद मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील डॉ.मिलिंद जीवने, प्रकाश गायकवाड, सुखदेव रामटेके यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी जयकृष्ण बोरकर, चित्ररेखा रामटेके, करुणाताई सिरसाठ आदींची उपस्थिती होती. संतोष जीवने, गुलाब सिसले, मंगेश रामटेके यांनी प्रास्ताविक, संचालन आणि आभार प्रदर्शन केले. या सोहळ्यानंतर ‘धम्मदीक्षा’  नाट्यप्रयोग सादर झाला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी सुरेश जाधव, सतीश रामटेके, डॉ.आनंदराव कांबळे, भारत लढे, देवकुमार शेंडे, जोतिबा कानिंदे, संजय पाईकराव, प्रवीण लढे, अरविंद मानकर, बंडू सोनडवले, शामकांत धोटे, संदीप भरणे, भारत मोटघरे, ओम नैनपाल, भाविक भगत, संदीप कानिंदे, गुणवंत चंदनखेडे, संजय कांबळे, प्रवीण कांबळे, मनोज मुनेश्‍वर, शशिकला नैनपाल, शोभाताई रामटेके, अर्चना तुरे, जिजाबाई बनसोड आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)