शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
5
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
6
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
7
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
8
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
9
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
10
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
11
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
12
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
13
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
14
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
15
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
16
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
17
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
18
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
19
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

पतीला संशय आल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाले. त्यातूनच ती वर्षाभरापासून वणी येथे किरायाने राहत होती. तिचा संजय सोबत संपर्क सुरूच होता. तो प्रतिसाद देत नसल्याने तिने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लाॅक केला होता. गुरुवारी रात्री ते दोघे पुन्हा वणीत भेटले. त्यानंतर नांदेपेरा रोडवर खुनाची ही घटना घडल्याचे सांगितले जाते. 

ठळक मुद्देवणी तालुक्यातील थरार : प्रियकर टॅक्सी चालकाला वरोरा तालुक्यातून अटक

  लोकमत न्यूज नेटवर्कवणी : अनैतिक संबंधातून टॅक्सी चालकाने आपल्या प्रेयसीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची खळबळनजक घटना शुक्रवारी वणी तालुक्यातील नांदेपेरा रोडवर वांजरी शेतशिवारात उघडकीस आली. जया मनोज आवारी (३२)  रा. वडोदा ता. वरोरा असे मृताचे नाव आहे. ती वणीतील पटवारी काॅलनीत दोन मुलांसह किरायाने राहत होती.  ती मूळची वणी तालुक्याच्या पिंपळगाव येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता वांजरी येथील बडवाईक यांचा सालगडी गोठ्यातून बैल काढत असताना त्याला जयाचा मृतदेहच आढळून आला. याबाबत  माहिती मिळताच वणीचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, फौजदार माया चाटसे, एकाडे यांचे  पथक व एसडीपीओ संजय पुज्जलवार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी मृताच्या कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला.  वणीचे ठाणेदार वैभव जाधव नागपूरला असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी या खुनाच्या तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तातडीने तपासचक्रे  फिरवून आरोपी प्रियकर संजय सालवटकर (४५) रा. साखरा ता. वरोरा जि. चंद्रपूर याला ताब्यात घेण्यात आले. त्याने खुनाचे प्रात्यक्षिक पोलिसांना करून दाखविले. खुनासाठी वापरलेला लोखंडी राॅडही आरोपीने सांगितलेल्या जागेवरून जप्त करण्यात आला. या आरोपीच्या अटकेसाठी वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांची मदत घेण्यात आली. मुलाला शाळेत नेताना जुळले सूत पोलीस सूत्रानुसार, जयाचा विवाह वडोदा येथे झाल्याने ती सहा वर्षांपासून तिथे रहायची. आरोपी टॅक्सी चालक संजय सालवटकर हा जयाच्या मुलांना शेगाव येथे शाळेत नेण्या-आणण्याचे काम करीत होता. या दरम्यान त्यांच्यात प्रेमसूत जुळले. जयाने केला संजयचा नंबर ब्लाॅकपतीला संशय आल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाले. त्यातूनच ती वर्षाभरापासून वणी येथे किरायाने राहत होती. तिचा संजय सोबत संपर्क सुरूच होता. तो प्रतिसाद देत नसल्याने तिने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लाॅक केला होता. गुरुवारी रात्री ते दोघे पुन्हा वणीत भेटले. त्यानंतर नांदेपेरा रोडवर खुनाची ही घटना घडल्याचे सांगितले जाते. घरुन गेलेली जया परतलीच नाही गुरुवारी रात्री ती मामाकडे जातो म्हणून घरुन गेली. मात्र बराच वेळ होऊनही परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. हा शोध सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी नांदेपेरा रोडवर मृतदेह आढळला. हा मृतदेह जयाचाच असल्याची ओळख तिच्या कुटुंबीयांनी पटविली.  एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 

वणी पोलिसांना दोन दिवसांपूर्वी फोन  वणी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा फोन आला, तिने आपले नाव सांगितले नाही, मात्र मला बलात्काराची तक्रार द्यायची आहे, असे तिने म्हटले. त्यावर तिला प्रत्यक्ष ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र ती आली नाही. हा फोन जयाचाच असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. 

 

टॅग्स :Murderखून