शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

मुंबईतील बैठकीसाठी भाजपाचे शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: June 28, 2014 23:47 IST

भाजपाच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी जिल्ह्यातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या वाहनात बसविण्याकरिता

यवतमाळ : भाजपाच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी जिल्ह्यातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या वाहनात बसविण्याकरिता या नेत्यांमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. लोकसभेतील विजय आणि आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी या अनुषंगाने २ व ३ जुलै रोजी मुंबईत भाजपची बैठक होत आहे. या बैठकीसाठी भाजपाचे तालुकास्तरापर्यंत प्रमुख पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी व नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभेच्या तयारीचा भाग म्हणून ही बैठक होत असल्याने भाजपाच्या नेत्यांकडून यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. या बैठकीत जिल्ह्यातील भाजपाच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. कुणी पदाधिकारी आपल्या विरोधात तेथे बोलू नये, या दृष्टीनेही मनधरणी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी इच्छा नसूनही जुळवून घेतले जात आहे. मुंबईतील या बैठकीत शक्ती प्रदर्शन करायचे म्हणून जिल्ह्यातील विधानसभेचे इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहे. कुणी ट्रॅव्हल्स, कुणी खासगी वाहने तर कुणी रेल्वेचे बुकिंग केले आहे. जिल्हाभरातून दीडशे ते दोनशे कार्यकर्ते बैठकीला जावू शकतात. यातील जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्या वाहनात बसावे, या माध्यमातून आपली शक्ती दिसावी असा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांपुढेही नेमके कुणाच्या गाडीत बसावे, असा पेच निर्माण झाला आहे. यवतमाळच नव्हेतर भाजपाच्या वाट्याला असलेल्या राळेगाव, आर्णी, उमरखेड या विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनीसुद्धा कार्यकर्त्यांची अशीच जुळवाजुळव चालविली आहे. परंतु त्यासाठी त्यांना बरीच कसरत करावी लागत असल्याचे दिसून येते. ३० जून रोजी भाजपच्या कार्यकर्त्यांची ही फौज वेगवेगळ्या मार्गाने मुंबईकडे कुच करणार आहे. भाजपची ही बैठक लोकसभेतील यशासंदर्भात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या कौतुकासाठी होत असल्याचे सांगितले जाते. आपल्या सोयीने बैठकीचा अर्थ घेऊन श्रेष्ठींसमोर आपली लोकाभिमुख प्रतिमा दाखविण्याचा खटाटोप सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)