शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पहिल्यांदाच दोन आकड्यात

By admin | Updated: February 24, 2017 02:33 IST

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पाच दशकांवरील इतिहासात पहिल्यांदाच भाजपाला सदस्यांची दोन आकडी संख्या गाठता आली.

नेतृत्व पालकमंत्र्यांचे : वणी, राळेगावच्या आमदारांची साथ यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पाच दशकांवरील इतिहासात पहिल्यांदाच भाजपाला सदस्यांची दोन आकडी संख्या गाठता आली. गेल्या वेळी केवळ चार सदस्य संख्या असलेल्या भाजपाने यावेळी गरुड झेप घेत तब्बल १७ उमेदवार निवडून आणले. पालकमंत्री मदन येरावार यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आखाड्यात उतरली होती. त्यांच्या दिमतीला चार आमदार असले तरी त्यातील उमरखेड व आर्णीचे आमदार आपले कसब दाखविण्यात फेल ठरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राळेगावचे आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांची कामगिरी सर्वात सरस ठरली. त्यांच्या या कामगिरीत आणि विशेषत: राळेगावात काँग्रेसमधील बंडखोरांचे योगदानही बरेच मोठे असल्याचे सांगितले जाते. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही आपली चमक दाखविली. मात्र त्यांना ती वणी, झरी पुरतीच मर्यादित ठेवता आली. मारेगावात त्यांच्या नेतृत्वाला काँग्रेसने आव्हान दिले. जिल्हा परिषदेतील भाजपाला लाभलेल्या चौपट यशाच्या कामगिरीचे नेतृत्व पालकमंत्री म्हणून मदन येरावार यांनी केले आहे. या कामगिरीचे श्रेयही सेनापती म्हणून त्यांना दिले जात आहे. परंतु त्यांच्या यवतमाळ या विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेनेने भाजपाला सुरूंग लावल्याचे चित्र पहायला मिळते आहे. यवतमाळ मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या चार पैकी दोनच जागा भाजपाला जिंकता आल्या. अन्य दोन जागांवर शिवसेनेने कब्जा केला. लाडखेडची जागाही भाजपाला जिंकता आली नाही. तेथे शिवसेनेने भाजपाला आडवे केले.लालदिवा, सोबतीला पालकमंत्रीपद असल्याने यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ते व नागरिकांना ना. येरावार यांच्याकडून एकतर्फी कामगिरीची अपेक्षा होती. मात्र शिवसेनेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ही अपेक्षा फोल ठरली. यवतमाळ पंचायत समितीमध्येसुद्धा आठ पैकी सर्वाधिक चार जागा सेनेने पटकावून भाजपापुढे आव्हान उभे केले आहे. गेल्या वेळी पेक्षा यवतमाळ मतदारसंघ व जिल्हा परिषदेत भाजपाची कामगिरी उत्कृष्ट ठरल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असला तरी जिल्हाभर भाजपाची एकूणच असलेली राजकीय ताकद बघता हे श्रेय अर्धेच असल्याचे बोलले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)